Showing posts with label महापुरुषांचे वर्गीकरण नको. Show all posts
Showing posts with label महापुरुषांचे वर्गीकरण नको. Show all posts

Wednesday, 11 April 2018

महात्मा फुले याना एक पत्र



आदरणीय महात्मा फुले याना विनम्र अभिवादन , आज तुम्हाला विचार आला असेल आज याला आपली आठवण कशी काय आली , तसं तुम्ही पाहत असालच इथे निवडणूक जवळ आल्या कि इथल्या लोकांना राजकारण्यांना तुमची आठवण येतेच कि कारण येथे तुमचं नाव घेतलं आणि तुमचा फोटो बॅनर ला लावला कि इथे स्वतःला पुरोगामी म्हणवून घेता येते ,तुमचं कार्य एवढा मोठं आहे कि आजसुद्धा तुमचा नावाचा वापर करून इथे स्वतःला पुरोगामी म्हणवून घेता येते, आज या पात्राच्या निमित्याने या काही भावना तुमच्या पर्यंत पोहचवत आहे
महात्मा फुले आम्हाला माफ करा
तुम्ही इथे गोर गरीब लोकांना शिक्षण मिळावे म्हणून अनेक शाळा उघडल्या पण आज इथे तुमचा नावानी अनेकांनी इथे मोठ्या शाळा आणि शिक्षण संस्था उघडल्या आणि त्याच संस्थेमधून भरमसाठ फी आकारानं सुरु आहे ,अगदीच काय इथे शिक्षणाचं बाजारीकरण सुरु आहे.

तुम्ही ज्या भिडे वाडा मध्ये मुलीची पहिली शाळा सुरु केली त्याची अवस्था फार दयनीय झाली आहे , इथल्या राजकारण्यांना तुमचा नावाचे मोठे बॅनर लावायला वेळ आहे पण भिडे वाड्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही .

तुम्ही स्वतःच्या पत्नीला शिकवून पहिली मुख्यध्यापिका बनवून समाजासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित केला होता पण आज सुद्धा तुमचं नाव घेणारे लोक एकीकडे स्वतःच्या घरच्या स्त्रीला मात्र पदर घेऊन किंवा बुरखा घालून चौकटी च्या आतच ठेवतात , अनेकांच्या घरी आज सुद्धा मुलगा आणि मुलीच्या शिक्षण मध्ये तफावत पाहायला मिळते.

मुलींसाठी तुम्ही इथे ठिकठिकाणी शाळा उघडल्या , स्त्रियांना पुरुषांप्रमाणे शिक्षण मिळावं , समानता मिळावी म्हणून तुम्ही प्रयत्न केलेत , आमच्या साठी तुम्ही पहिले स्त्रीवादी म्हणजे फेमिनिस्ट व्यक्ती आहेत , आज मात्र इथे फेमिनीसम ची अख्खी व्याख्या च इथल्या फेमिनिस्ट लोकांनी बदलून टाकली आहे .

तुम्ही शिवरायांचं पोवाडा लिहिला पण आज तुमचा पूर्ण पोवाडा न वाचता एका शब्दावरून निष्कर्ष काढणारे अनेक लोक आहेत.

तुमचं  नाव घेऊन काही लोक इथे द्वेष पसरवण्याचं सुद्धा काम करतात पण कदाचित ते हे विसरले कि ज्यांचा विरुद्ध ते द्वेष पसरवत त्याच समाजातील मुलगा तुम्ही दत्तक घेतला होता .
अजून सुद्धा बरंच काही सांगायचं पण तूर्तास एवढंच , शेवटी एवढंच सांगावं वाटते तुमचा नावाचा लोकांनी फक्त राजकारण पुरता न करता तुमचं शिक्षणाचं कार्य पुढे नेण्याकरिता अखंड करावा
तुमच्याच महाराष्ट्रातील एक तरुण

Sunday, 15 December 2013

महापुरुषांचे वर्गीकरण नको

                      आजपर्यंत  आपल्या महाराष्ट्रात अनेक महापुरुष होऊन गेले , अनेक महापुरुषांचे विचार या महाराष्ट्राच्या भूमीला लाभले मग ते छत्रपती शिवाजी महाराज असो कि लोकमान्य टिळक असो किवा महात्मा फुले असो कि बाबासाहेब आंबेडकर असो किवा अण्णाभाऊ साठे ,आज असे अनेक महापुरुष या भूमीत होऊन गेले म्हणूनच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी राज्य समजले जायचे ,इतर अनेक राज्यापेक्षा आपल्या महाराष्ट्राचा विकासदर हा जास्त होता ,पण आज आपला महाराष्ट्र अनेक बाबतीत मागे पडतोय ,कारण येथे महापुरुषांच्या विचारांनाच कोंडल्या चाललाय आणि महापुरुषांच वर्गीकरण होता आहे.
                     आतापर्यंत  अनेक महापुरुष होऊन गेले त्यातले कोणी देशासाठी लढले ,तर कोणी समाज सुधारणेसाठी तर कोणी महिलांसाठी असे सर्व महामानव होऊन गेले म्हणूनच आजपर्यंत आपण एवढी प्रगती करू शकलो, पण आजकाल त्यांच्या अनुयायांनी तर त्यांन फक्त तेवढ्यापुरता मर्यादित केलेला आहे, महामानवांनी केलेले प्रयत्न हे त्या अनुसार योग्यच होते अथवा आपण त्याला म्हणू ते कालसापेक्ष होते हे विसरून अनेक जन म्हणजेच त्यांना मानणारे ,अनुयायी अथवा इंग्रजी मध्ये follower एकतर त्याचे अंधानुकरण  करायचे बघतात अथवा प्रसंगी उठसुठ इतर महापुरुषांना नवे ठेवत बसतात , आणि आपल्या महापुरुषांचे विचार तिथेच ते नेस्तनाबूत करत असतात 
खर तर स्वातंत्रपूर्व काळात आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीने आणि सामाजिक विषमतेने ग्रासला होता ,त्यामुळे त्या काळात राष्ट्रवादी विचारसरणी तसेच सामाजिक समता अश्या दोन्ही प्रकारच्या महापुरुषांची गरज होती, दोन्ही गोष्टी समांतर सुरु होत्या जर आपण उदाहरणच घ्यायचं झाल तर एका बाजूने टिळक हे देशासाठी लढत होते तर महात्मा फुले हे सामाजिक समतेसाठी  लढत होते म्हणून काही दोन महापुरुषात काही दुरावा निर्माण झाला नाही अथवा त्यांनी आज जसे त्यांचे अनुयायी एकमेकांवर चिखलफेक करतात तशी चिखलफेककधी केली उलट टिळक आणि आगरकर हे जेल मधून बाहेर आल्यावर महात्मा फुले यांनी त्यांचा सत्कार केल्याचे उदाहरण आहे , दुसरे उदाहरण घ्यायचे झाल्यास आपण बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभ भाई पटेलांचे घेऊ अथवा गांधीचे घेऊया ,हे सर्व पुणे करार करून बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा गांधी यांचे प्राण वाचविल्याचे आपल्याला माहितच आहे
हे उदाहरण देण्यामागचा हेतू हाच होता कि आज इंग्रज जरी नसले आणि सामाजिक विषमता जरी कमी झाली असली तरी आज सुद्धा या विचारांची आपल्याला कुठेना कुठे गरज हि पडते .त्यामुळे महापुरुषांच होता असलेल्या वर्गीकरणाला कुठेतरी थांबवायलाच हवाय ,नाहीतर काही वर्षांनी शिवाजी महाराज ,बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले ,लोकमान्य टिळक यासारखे महापुरुष हे कोण्या एका विशिष्ट वर्गापर्यंत अथवा जातीपर्यंत मर्यादित राहतील , आपल्या थोर पूर्वजास विसरून जाऊन कोणतेही राष्ट्र उदयास आले नाही व येणार नाही असे जे म्हटल्या जाते ते एका अर्थ योग्यच म्हटल्या जाते ,त्यामुळे कुठेतरी हे महापुरुषांना मर्यादित करण अथा त्यांचं वर्गीकरण करण थांबायलाच हव ठेव्हाच आपण त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकू
जय हिंद , जय महाराष्ट्र
                                                                                                                                          प्रसाद पाचपांडे