Friday 20 April 2018

तुझ्या त्या प्रत्येक शब्दासाठी


तुझ्या त्या प्रत्येक शब्दासाठी
आज सुद्धा झुरतो मि
तुझ्या प्रत्येक हाके ची
वाट आज पाहतो मि

तुझ्या प्रत्येक हास्यात
गीत माझे शोधतो मि
तुझ्या प्रत्येक दुःखात
अश्रु माझे जपतो मी

चूक ती माझी होती
जी तुझ्यावर निघाली
पण आज पण त्या चुकीची
शिक्षा भोगतो मी

तुझ्या झालेल्या प्रत्येक
वेदने मधे हृदय माझे टूटत होते
फक्त तुझे मन राखण्याची
ते वाट पाहत होते

तुझ्या प्रत्येक शब्दाला
आज सुद्धा झुरतो मी
हरवलेल्या त्या आठवणी मध्ये
स्वतःला शोधतो मी

प्रसाद पाचपांडे
अमरावती/ नवी मुंबई


Wednesday 11 April 2018

महात्मा फुले याना एक पत्र



आदरणीय महात्मा फुले याना विनम्र अभिवादन , आज तुम्हाला विचार आला असेल आज याला आपली आठवण कशी काय आली , तसं तुम्ही पाहत असालच इथे निवडणूक जवळ आल्या कि इथल्या लोकांना राजकारण्यांना तुमची आठवण येतेच कि कारण येथे तुमचं नाव घेतलं आणि तुमचा फोटो बॅनर ला लावला कि इथे स्वतःला पुरोगामी म्हणवून घेता येते ,तुमचं कार्य एवढा मोठं आहे कि आजसुद्धा तुमचा नावाचा वापर करून इथे स्वतःला पुरोगामी म्हणवून घेता येते, आज या पात्राच्या निमित्याने या काही भावना तुमच्या पर्यंत पोहचवत आहे
महात्मा फुले आम्हाला माफ करा
तुम्ही इथे गोर गरीब लोकांना शिक्षण मिळावे म्हणून अनेक शाळा उघडल्या पण आज इथे तुमचा नावानी अनेकांनी इथे मोठ्या शाळा आणि शिक्षण संस्था उघडल्या आणि त्याच संस्थेमधून भरमसाठ फी आकारानं सुरु आहे ,अगदीच काय इथे शिक्षणाचं बाजारीकरण सुरु आहे.

तुम्ही ज्या भिडे वाडा मध्ये मुलीची पहिली शाळा सुरु केली त्याची अवस्था फार दयनीय झाली आहे , इथल्या राजकारण्यांना तुमचा नावाचे मोठे बॅनर लावायला वेळ आहे पण भिडे वाड्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही .

तुम्ही स्वतःच्या पत्नीला शिकवून पहिली मुख्यध्यापिका बनवून समाजासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित केला होता पण आज सुद्धा तुमचं नाव घेणारे लोक एकीकडे स्वतःच्या घरच्या स्त्रीला मात्र पदर घेऊन किंवा बुरखा घालून चौकटी च्या आतच ठेवतात , अनेकांच्या घरी आज सुद्धा मुलगा आणि मुलीच्या शिक्षण मध्ये तफावत पाहायला मिळते.

मुलींसाठी तुम्ही इथे ठिकठिकाणी शाळा उघडल्या , स्त्रियांना पुरुषांप्रमाणे शिक्षण मिळावं , समानता मिळावी म्हणून तुम्ही प्रयत्न केलेत , आमच्या साठी तुम्ही पहिले स्त्रीवादी म्हणजे फेमिनिस्ट व्यक्ती आहेत , आज मात्र इथे फेमिनीसम ची अख्खी व्याख्या च इथल्या फेमिनिस्ट लोकांनी बदलून टाकली आहे .

तुम्ही शिवरायांचं पोवाडा लिहिला पण आज तुमचा पूर्ण पोवाडा न वाचता एका शब्दावरून निष्कर्ष काढणारे अनेक लोक आहेत.

तुमचं  नाव घेऊन काही लोक इथे द्वेष पसरवण्याचं सुद्धा काम करतात पण कदाचित ते हे विसरले कि ज्यांचा विरुद्ध ते द्वेष पसरवत त्याच समाजातील मुलगा तुम्ही दत्तक घेतला होता .
अजून सुद्धा बरंच काही सांगायचं पण तूर्तास एवढंच , शेवटी एवढंच सांगावं वाटते तुमचा नावाचा लोकांनी फक्त राजकारण पुरता न करता तुमचं शिक्षणाचं कार्य पुढे नेण्याकरिता अखंड करावा
तुमच्याच महाराष्ट्रातील एक तरुण

Sunday 11 February 2018

प्रेम आणि भावना

आजकाल बरेच जन येथे प्रेमावर लिहितात तर अनेक लोकांना येथे सिम्पल सिम्पल हवी असे म्हणनारे सुद्धा बरेच् आहे
मी कॉलेज मधे असताना त्या काळी तरुणां मधे असणार प्रेम हे जगजीत सिंह यांच्या होश वालो को खबर नाही या गाण्या सारखा असायचं  आणि जो संपायचं  ते ' हम लबो से कह न पाये उनसे हाले दिल कभी और वे समझे नाही ये खामोशी क्या चीझ है' . आजकाल प्रेमाची व्याख्या बदलली आहे पहिल्या दिवशी भेट होते आणि दुसऱ्या दिवशी प्रोपोज़ तिसऱ्या दिवशी break up . पण पहिल्या दिवशी भेट झालेल्या माणसाला दुसऱ्या दिवशी प्रेम झाल यात प्रेम असत का? एका व्यक्ति ला जाणून घेण्याकरिता  किवा स्वभाव समजण्याकरिता कमित कमी 2-3 भेटी तरी आवश्यक असतात पण एका दिवसात किवा भेट न होता ही प्रेम होने हे शक्य आहे का कदाचित आजची पीढ़ी ही attraction  ला च प्रेम समजत असावी आणि त्यमागे गुरफटुन गेलि असावी
प्रेम ही एक नाजुक भावना असते जी हळूहळू फुलत जाते ,आपण ज्या व्यक्तिवर प्रेम करतो त्याला आपण प्रेम व्यक्त करायची पण गरज नसते अनेक वेळा न सांगता देखील समोरच्या ला ते कळून चूकते रोज एकमेकांशि भांडणारे किवा 2 दिवस दूर गेले की त्याना दुरावा जाणवू लागतो आणि कळते ते प्रेम अगदी 2 प्रेम करणारे व्यक्ति एकमेकांसोबत रोज भांडणारे मात्र 4 चौघात आपल्या आवडत्या व्यक्ति मागे त्याचा बद्दल चांगलेच बोलताना दिसतात आणि हळुवार फुलत जाणार प्रेम हे आयुष्यभरासाठी असत अगदी
कुसुमाग्रज यांच्या खालील ओळी प्रमाणे असत:
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस,
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं!
शब्दांकन 
प्रसाद पाचपांडे
अमरावती /नवी मुंबई