पुण्यात नुकताच उघडलेलं शेगावचा स्वाद हे हॉटेल म्हणजे विदर्भ वासियांसाठी एक पर्वणीच आहे, नुकताच काही दिवस आधी विदर्भाची खासियत असलेल्या रोडग्याची आठवण अली आणि म्हणून शेअरच करतो आणि बघतो तर पुण्यात अस्सल रोडगे निघाले म्हणून त्यांना कॉल केला तर ते विदर्भातील अंजनगाव सुर्जी येथील निघाले.
तिथे गेल्यावर त्यांनी आम्हाला अमरावतीची अस्सल संभारवाडी दाखवली, कितीतरी दिवसांनी अशी संभारवाडी खायला मिळाली, अस्सल वर्हाडी चवीची संभारवाडी होती, मग त्यानंतर त्यांच्याकडील इतर मेनू बघितले त्यात खालील पैकी काही मेनू होते, ज्यात
1)विदर्भाची झुणका भाकरी
2)मिरचीची भाजी
3)आलू बोन्डा आणि रस्सा
4)कधी गोळे आणि वांग्याचं भारी
5)रोडगे आणि रस्सा भाजी
त्यानंतर आम्ही त्यातला रोडगे ची ऑर्डर केली, 2 लोक सहज खाऊ शकतील असा मोठा रोडगा होता आणि झणझणीत वांग्याची भाजी आणि तीच विदर्भाची चव.
आपण पुण्यात आणि विदर्भ बाहेर जरी असलो आणि आपल्याला विदर्भाची चव चाखायची असेल तर या हॉटेल ला नक्की भेट देता येईल
पत्ता :- शेगावचा स्वाद (Shegaoncha Swaad) चा अचूक पत्ता खालीलप्रमाणे आहे:
शॉप नं. २, संयोग डेव्हलपर्स बिल्डिंग,
म्हाडाजवळ, पिंपळे सौदागर रोड,
पिंपरी गाव, पुणे - 41111
