Friday 19 June 2020

मानसिक तणाव, आत्महत्या आणि जीवन


राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभाग च्या रिपोर्ट नुसार भारतात प्रत्येक दिवशी २८ लोक आत्महत्या करतात, २०१८ ला १०००० लोकांनी आत्महत्या केली तर २०१७ ला ९९०५ लोकांनी जीव दिला ( द हिंदू यांच्या बातमीनुसार), पण आपल्या सर्वसामान्य लोकांचा या घटनेकडे लक्ष तेव्हाच जाते जेव्हा सुशांत सारखा सेलेब्रेटी आपण गमावतो आणि नंतर सुरु होतात लोकांचे मोठमोठाले लेख अरे कोणाला तरी कॉल करायचा होता पासून कोणाला मोकळं बोलायचे असेल तर माझ्याशी बोलत जा इथपर्यंतची दिखावे आणि तिथून पुढे ३,४ दिवस हे पोस्ट वगैरे चालतात पण बंद होता मग परत आपण एखादा सुशांत, भैयूज्जी महाराज, पायल तडवी असो कि सागर चिंता (माझ्या जवळचा मित्र मुंबईचा ) होण्याची वाट पाहत बसतो.

sushant


तुमच्या जवळचा एक मित्र असतो, जो कंपनीत जेवताना पासून प्रत्येक गोष्टीत तुमच्या सोबत असतो, कंपनी सोडल्यावर सुद्धा दुसऱ्या गावाला जाताना तो तुम्हाला सांगून जातो आणि कंपनी सोडल्यावर अचानक एक दिवस दुसर्याकडून तुम्हाला त्याच्याविषयी कळते आणि समोरची व्यक्ती सामान्य कुठूम्बातील असल्यामुळे नाही त्यांच्या जाण्यानी कोणी त्यांनी का केलं असा विचार करत किंवा कोणी दुखी होता नाही कारण ती व्यक्ती एका सामान्य कुटुंबातील असते आणि भारतात सरासरी रोज अश्या २८ घटना घडतात.





पुण्यात एकाच कुटुंबातील ४ लोकांनी आत्महत्या केली पण त्याबद्दल समाजात कुठेच काही प्रतिक्रिया उमटली नाही, किंवा कोणालाही बोलावसं वाटलं तर माझ्याशी बोला म्हणणारे तत्सम लोक कुठेच नव्हते, सांगायचं तात्पर्य एवढाच कि अश्यावेळी कोणीही त्या व्यक्तीला साथ देत नाही याउलट एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये असेल तर त्याला निग्लेक्ट किंवा टार्गेट करण्याकडेच लोकांचा काल जास्त पाहायला मिळतो, या गोष्टीची सुरुवात शाळेपासून देखील होते एखादा मुलगा नाराज किंवा डिप्रेस दिसत असेल तर अनेकवेळा शिक्षकच त्याच कारण जाणून न घेता त्यांच्यावर वर्गात अजून अजून मस्करी करून त्याला चेष्टेचा विषय बनवतात किंवा एखादा मुलगा मुलगी जर थोडी दबावात राहत असेल तर त्या व्यक्तीची मेंटल torching किंवा harassment केल्या जाते आणि मग त्या व्यक्तीच जगन असह्य होते अगदीच याचा परिणाम त्या व्यक्तीचा अभ्यास आणि इतर गोष्टीवर होते, आणि समूहानेमिळून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणे सोपे जाते त्यामुळे इतर लोक सुद्धा अश्यावेळी त्या व्यक्तीला टार्गेट करण्याचा पाहतात.

भारतात तरुणाच्या आत्महत्या, मानसिक आरोग्य हा पुढे वाढत जाणारा एक गंभीर प्रश्न आहे त्यामुळे शिक्षणात जेव्हा मुलगा ८ वि अथवा ९ वि मध्ये जातो तेव्हा त्यांना मानसशास्त्र नावाचा एक विषय ठेवण्याची गरज आहे जेणेकरून मुलांचं प्रबोधन होईल आणि ते कोणाचं मानसिक शोषण अथवा त्यांचं कोणीही मानसिक शोषण करू शकणार नाही, पण या सोबतच गरज आहे पालकांनी आपल्या पाल्याना मानसिक दृष्टीनं खंबीर बनवण्यासोबतच त्यांना चांगली शिकवण देण्याची जेणेकरून ते या गोष्टीला बळी पडू नये आणि त्यांच्यामुळे सुद्धा कोणी या प्रकारचं पाऊल उचलू नाही.
आयुष्य हे एकदाच मिळत एकाद्या गोष्टीपासून तुम्हाला त्रास होता असेल तर ती गोष्ट सोडून द्या पण असे पर्याय उचलू नका 

:- प्रसाद पाचपांडे
   अमरावती