Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Friday, 20 April 2018

तुझ्या त्या प्रत्येक शब्दासाठी


तुझ्या त्या प्रत्येक शब्दासाठी
आज सुद्धा झुरतो मि
तुझ्या प्रत्येक हाके ची
वाट आज पाहतो मि

तुझ्या प्रत्येक हास्यात
गीत माझे शोधतो मि
तुझ्या प्रत्येक दुःखात
अश्रु माझे जपतो मी

चूक ती माझी होती
जी तुझ्यावर निघाली
पण आज पण त्या चुकीची
शिक्षा भोगतो मी

तुझ्या झालेल्या प्रत्येक
वेदने मधे हृदय माझे टूटत होते
फक्त तुझे मन राखण्याची
ते वाट पाहत होते

तुझ्या प्रत्येक शब्दाला
आज सुद्धा झुरतो मी
हरवलेल्या त्या आठवणी मध्ये
स्वतःला शोधतो मी

प्रसाद पाचपांडे
अमरावती/ नवी मुंबई


Saturday, 13 August 2016

कोणी सांगेल का तिला

कोणी सांगेल का तिला
कधी कळेल का तिला
तिच्या हृदयात थोड़ी जागा 
देईल का ती मला
अंतरीचे बोल 
कधी कळेल का तिला
मनातील भावना
उमगेल का तिला
कोणी सांगेल का तिला
कधी कळेल का तिला
शब्दचे अर्थ कळतील
का तिला
चेहर्यवरील हसु
बनेल का ती माझ्या
कधी कळेल का तिला
कोणी सांगेल का तिला
प्रसाद पाचपांडे
अमरावती / नवी मुंबई

Friday, 8 April 2016

व्याकूळ

तुझ्या त्या आठवणीने
आज सुद्धा व्याकूळ होतो मी
हरवलेल्या त्या शब्दांमध्ये
आज सुद्धा तुला शोधतो मी
पहाटेच्या त्या धुक्यांमध्ये
स्वप्न रंगवत होतो मी
रस्त्यावरील मृगजळाला
सत्य समाजात होतो मी
भावनेमध्ये अडकून
असा का गाफील होतो मी
जिंकायचे सोडून
पर्त्येक गोष्ट हरवत होतो मी
तुझ्या त्या आठवणीने
आज सुद्धा व्याकूळ होतो मी
हरवलेल्या त्या शब्दांमध्ये
आज सुद्धा तुला शोधतो मी
 कवी :- प्रसाद पाचपांडे
           अमरावती /नवी मुंबई

Wednesday, 19 November 2014

जीवन

जीवन  म्हणजे  निळ्या  निळ्या  नभातील  टपोर  चंदन  असत
प्रेमामध्ये  पडत  जाणार  पाहिलं  पाऊल हे  जीवन  असते
नुकतच  जन्मणार  मुल  हे  जीवन  असते ,
काळी  मधून  उमलणार  फुल  हे  जीवन  असते .........

जीवन  म्हणजे   असतो  अमृताचा  झरा,
जे  जगण्या  करिता  येतात  असंख्य  तारे  आणि  तारका ,
जीवन  म्हणजे  कष्टाकार्याची  भाकरी ,
आई  ची  मुलाला  मिळणारी  प्रेमाची  सावली .............!!!

जीवन  हे  एक  सुंदर  रोपट असत
कुणीही  सोबत  नसाल  तरी  ते  जगायचं  असत
कुणीही  काही  मागितलं  तरी  ते  द्यायचं  असत
पण  दिलेलं  परत  हे  मागायचं  नसत ..............

असे  हे  आपल  जीवन  असत
ज्यात  कधीही  थांबायचं  नसत
थोडावेळ  विश्रांती  घेऊन
पुढच  पाऊल  हे  टाकायचाच  असत
            - प्रसाद पाचपांडे
            पुणे / अमरावती 

Wednesday, 11 June 2014

शिवराज्याभिषेक दिन

सोनियाचा दिवस आज उगवला
जिजाउचा शिवबा आज छत्रपति जाहला
स्वराज्याचे तोरण सजले
आज रयतेचे राज्य आले ------------ 1
व्यर्थ नव्हे ते बाजी तानाजी चे बलिदान
याच स्वराज्यासाठी ज्यांनी दिले अपुले प्राण
तोचि मंगल दिवस आज उगवला
जिजाउचा शिवबा आज छत्रपति जाहला ------२
जुलमी मुघलांचा त्रास ज्यांनी रोखला
स्त्रियांना येथे सन्मान दिधला
शेतकऱ्यांचा कैवारी बनुनी
जिजाउचा शिवबा आज छत्रपति जाहला ----२
वापर करुनिया गनिमी काव्याचा
पाडाव केला शत्रूंचा
रक्षण करुनिया सज्जनाचा
कर्दनकाळ बनला दुर्जनांचा -------३
होती सुरुवात शिवशकाची
वाजे तुतारी येथे शिवशाहीची
तोचि मंगल दिवस आज उगवला
जिजाउचा शिवबा आज छत्रपति जाहला------४
                 -  प्रसाद पाचपांडे

Thursday, 12 December 2013

बाळासाहेब

मराठीचा श्वास तूम्हीं
हिंदुत्वाचा प्राण तुम्ही
शिवरायांचा बाणा शिकाविला
महाराष्टाचे वाघ तुम्ही ....................................१

विचारांची मूर्ती तुम्ही
पराक्रमांची कीर्ती तुम्ही
सावरकरांचे हिन्दुराष्ट घडविले
निष्ठावान शिवभक्त तुम्ही ...........२

व्यंगचित्राचे हत्यार तुमचे
मार्मिक आहे कट्यार तूमची
सामना तिचा करावयाला
हिम्मत न होई कुणाची .....................................३

वागलास कितीही कठोर तुम्ही
अंतरी मात्र निर्मल तुम्ही
कर्मासाठी लढणे शिकविले
हिंदुहृदय सम्राट तुम्ही ..............४

- प्रसाद पाचपांडे

Wednesday, 11 December 2013

उठा तरुणानो उठा चला

उठा तरुणानो उठा चला
गीत राष्ट्राचे गाऊ चला
शृंखला एकतेची बनवूया
राष्ट्र गीत सारे गाऊया....................१
भक्त आम्ही गांधीचे
आणि भगतसिंग,आझादांचे
राष्ट्रासाठी लढणाऱ्या
त्या साऱ्या क्रांतीवीरांचे...................2
विचार आमचे शांततेचे
लाभले सिद्धार्थ आणि महावीरांचे
आदर्श आहे श्रीरामांचे
अन छत्रपति शिवरायांचे ....................३
उठा तरुणानो उठा चला
राष्ट्र गीत सारे गाऊया..................
बुरखा भ्रष्टाचाराचा फोडाया चला
भ्रष्ट राजकारण्यांना धडा शिकवाया चला ................
------------ प्रसाद पाचपांडे--------

माय मराठी

माय मराठी माय मराठी
जशी ज्ञानेशाची अमृतवाणी
शिवबाचे मावळे आम्ही
गाऊ स्वराज्याची गाणी ..........१
सावित्री रमा या आमच्या माता
थोर त्या जिजामाता
ज्यांच्या पोटी पुत्र होई
शिवबा रयतेचा राजा ..............२
भीमरायाची पसरली दुरवर कीर्ती
घेउनिया निळ्या झेंड्याची मशाल हाती
सावरकरांची ती अजरामर झेप ती
राष्ट्रप्रेम जगावी आमच्या मनी ..........३
कसे विसरावे त्या तुकोबांना
समाजासाठी झगडणाऱ्या गाडगेबाबांना
जय जय रघुवीर समर्थांना
महाराष्ट्र धर्म वाढवणार्यांना

प्रेम



प्रेम करायचे नसते असे लोक म्हणतात
मला नी वाटत सारेच खोटे बोलतात
गोष्टी आणि वचने सारेच असते खोटे
प्रेमामध्ये लेकहो कोणीच कोणाचे नसते ............१
प्रत्येकाच्या मनात खूप असतात भावना
तुटल्यावर ह्रुदय मात्र होतात फार वेदना
झालेल्या गोष्टीचा समोरच्याला पडतो विसर
तरीही का म्हणता लेकहो प्रेम असते अमर..........२
प्रेमामध्ये एका मित्राचे पानिपत झाले
म्हणून कि काय त्याने प्रेम करणेच सोडले
फुलासारख्या मुलीवर करीत होता प्रेम
ग्रोउप मध्ये येउन तिने वाजवला गेम ........३
म्हणून म्हणतो लेकहो प्रेम गीम सारे असते व्यर्थ
कशाला करता तुम्ही फालतुचे प्रयत्न
प्रसाद पाचपांडे
अमरावती