Showing posts with label हिंदुहृदयसम्राट. Show all posts
Showing posts with label हिंदुहृदयसम्राट. Show all posts

Thursday, 12 December 2013

बाळासाहेब

मराठीचा श्वास तूम्हीं
हिंदुत्वाचा प्राण तुम्ही
शिवरायांचा बाणा शिकाविला
महाराष्टाचे वाघ तुम्ही ....................................१

विचारांची मूर्ती तुम्ही
पराक्रमांची कीर्ती तुम्ही
सावरकरांचे हिन्दुराष्ट घडविले
निष्ठावान शिवभक्त तुम्ही ...........२

व्यंगचित्राचे हत्यार तुमचे
मार्मिक आहे कट्यार तूमची
सामना तिचा करावयाला
हिम्मत न होई कुणाची .....................................३

वागलास कितीही कठोर तुम्ही
अंतरी मात्र निर्मल तुम्ही
कर्मासाठी लढणे शिकविले
हिंदुहृदय सम्राट तुम्ही ..............४

- प्रसाद पाचपांडे