Sunday 3 July 2016

lost & found


lost & found नावाचा नवीन मराठी  चित्रपट येतोय एक नवीन विषय घेऊन
आता खरे तर लॉस्ट आणि फाऊंड असे या चित्रपटाचं नाव का ठेवलं असावं हा विचार मनात येतो , पण trailor पाहिल्यावर मग रोजची होणारी मुंबई करांची धावपळ ,त्याचं जीवन आणि त्या बदल्यात घरच्या पासून आणि आपल्या लोकां पासून दूर राहणाऱ्या लोकांमधे आलेला एकटे पणा आणि त्या गर्दी मध्ये तो माणूस कुठे तरी हरवून जातो एकटाच आणि त्यातून वाढत जाणार frustation आपल्या डोळ्यासमोरून जातो अगदी सिनेमाचा पहिला संवाद ऐकलं तरी लक्षात येईल , "जगात खूप एकटेपणा आहे , लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ नसतो , थकवा आहे मानसिक त्रास आहे ".
आणि अश्याच या एकटे पण मध्ये अडकलेले 4 अनोळखी लोक एकत्र येतात , एकमेकांना आधार देतात आणि पुढे हेच 4 अनोळखी  लोक   समाजात हाच वाढत चाललेला एकटेपणा दूर करण्यासाठी एकत्र येऊन काम करायचा ठरवतात  आणि ते एक प्रोग्राम राबवतात anti loneliness प्रोग्राम म्हणजेच ALP आणि त्या अंतर्गत ते ठरवतात की आपण अश्या लोकांना भेटायचं जे स्वतःला एकटे समजत असतील आणि त्यांना सहानुभूती नाही तर एक उमेद द्यायची आणि त्यांचा मधली ती व्यक्ती शोधायची जी हरवली असते
मी समाजात फिरत असताना मला अनेक लोक भेटतात जे एकटे पडले आहे किंवा स्वतःला एकटे समजतात किंवा जे frustation मध्ये असतात , अगदी या लोकांमध्ये घरा पासून दूर असणारे , जॉब सर्च करणारे , प्रेमभंग झालेले किंवा एकटे राहणारे , ज्यांचे मूल दूर राहतात अश्या वेळी त्या लोकांशी आपण 2 शब्द जरी प्रेमाचे बोललो तरी ते त्यांना सुखावतात किंवा अश्या हरवलेल्या लोकांना त्यांचा मधील तो किंवा ती सापडतो .चित्रपटातील 2 ओळी अगदी मनाचा ठाव घेऊन जातात
"अनोळखी लोकच कधी कधी ओळखीची वाटतात
आणि खरंच कोणी तरी हवं असत ना बोलायला ".
आणि अश्यावेळी त्या लोकांनी सुद्धा स्वतःला एकटे समजण्या पेक्षा एखाद्या व्यक्तीला जवळच समजून आपली मनातली गोष्ट सांगावी , कदाचित त्याचा मधील किंवा तिच्या मधील त्या व्यक्तीला हरवलेली तो किंवा ती व्यक्ती भेटून जाईल
याच एकटे पणा वर आणि या चित्रपटाला dedicated माझ्या 4 ओळी
"तहानलेल्या पाखराला जशी पाण्याची आस असते
एकटेपणा मध्ये सुद्धा  तशी कोणाची साथ हवी असते
अश्यावेळी दोन शब्द मायेचे सुद्धा मनात घर करून जातात
प्रेमाची नवी पावली मनात घर करून जातात".
-प्रसाद पाचपांडे
अमरावती / नवी मुंबई