Thursday 4 September 2014

नेमेचि येतो पावसाळा!


दरवर्षी पाऊस येतो, पाऊस म्हटला कि लहान मुलांसाठी शाळेच्या सुट्या, तरुणांसाठी असणार ते रोमांटीक वातावरण,गरम गरम भजे असे काही असते, अनेक तरुणांना तर पाऊस पाहून आपल्या प्रेयसी साठी कविता पण सुचतात ,असे हे पावसाच वातावरण असते, मला अश्या या पावसाळ्यात सगळ्यात जास्त आठवण येते ती माझ्या आजीची ,दरवर्षी पावसाळा सुरु झाला कि आजीची काळजी सुरु व्हायची ,११ वी मध्ये गेल्यानंतर जवळपास माझा जुना raincoat खराब झाला होता आणि फाटला देखील होता, तसेच पावसाळा सुरु झाला होता, ज्याप्रमाणे प्रत्येक मुलाच्या कॉलेज नियमित जाण्यामागे काहीतरी कारण असत त्याप्रमाणे माझ सुद्धा कारण होताच त्यातलं एक म्हणजे मी तसा काहीसा अभ्यासू पण होतो आणि मग कॉलेज वरून येतांना रोज भिजलेलो असायचो ,आजी मग रोज मी रेनकोट घ्यावा म्हणून मागे लागायची, तसेच रोज आईला म्हणायची कि दादासाठी रेनकोट घ्यावा लागेल,पण मी रोज दुर्लक्ष करायचो ,कारण मला पावसात भिजायला आवडायचं, हाच उपक्रम १२ वी मध्ये पण चालला आणि पुढे अभियांत्रिकी च्या 1st सेमिस्तेर ला सुद्धा जवळपास कॉलेज ला जाण्याचा कारण सारख असल्यामुळे तेव्हासुद्धा रोज जायचं आणि भिजून यायचो ,आणि आजी रोज रेनकोट बद्दल म्हणायची ,गाडी शेवटी ज्यादिवशी आजीची तब्येत जास्त झाली होती आणि आम्ही आजीला दवाखान्यात नेणार त्यासाठी मी आणि माझा मित्र राहुल भिजून आलो होतो ,तेव्हासुद्धा आजी आईला म्हणत होती कि "दादा पावसात ओला होतो आणि त्याचे पुस्तक खराब होतात त्यासाठी रेनकोट घेशील ".
आज इतक्या दिवसांनी असाच मी पाऊस आला कि भिजून जातो आणि आज सुद्धा मी रेनकोट घेतलेला नाही आहे , मग पावसोबत आजीच्या आठवणीमुळे भिजून गेलो कि,रस्त्याने नातवाला घेऊन जाणार्या एखाद्या आजीच्या छत्रीत हळूच जातो , मग ती आजी मला विचारते कि भिजला का रे भेट रेनकोट नाही का तुझ्याकडे?
- प्रसाद पाचपांडे अमरावती