Wednesday, 3 March 2021

लॉकडाउन मधील एक हॉरर कथा

 गणेश एका नामांकित संगणक कंपनी मध्ये काम करणारा मुलगा, फॉर्मल शर्ट, काळे शूझ घालून सकाळी ९ वाजता ऑफिस साठी निघणारा व रात्री ७-८ वाजता घरी येणार एक साधारण मुलगा, सकाळी रूम वरून निघाल्यावर मित्रांसोबत चहा पिणे आणि मग ऑफिस ला जाणे आणि ऑफिस वरून आल्यावर मित्रांसोबत रात्री जेवण करणे आणि webseries बघणे हा त्याचा नित्यक्रम.२०२० च्या नवीन वर्षात नुकताच गणेश ने त्यांच्या संगणक कंपनी जवळ लाँच झालेल्या टाउनशिप मध्ये एक फ्लॅट घेतला, टाउनशिप नुकतीच लाँच झाल्याने त्या एरिया च्या आसपास तशी विरळ वस्तीच होती आणि काही थोडेफार दुकान , त्याला फेब्रुवारी च्या आसपास त्या फ्लॅट च possession देखील मिळालं, अनेकांना गणेश प्रमाणे possession मिळालं होता पण त्यातील काही लोक दुसरीकडे राहत होते तर काही लग्न झालेले असल्यामुळे मुहूर्त आणि वास्तुशांती करून येणार होते, गणेश मात्र बॅचलर आणि त्यात IT Engineer असल्यामुळे भाड्याचे पैसे उगाच देण्यापेक्षा स्वतःच्या फ्लॅट मध्ये राहावं या उद्देश्याने राहायला आला.

गणेश चा स्वभाव हा कामापुरता बोलणारा असला तरी येता जात सोसायटी च्या चौकीदार, चहा वाला, दुकानदार यांच्याकडे पाहून हसणे आणि काय दादा वगैरे बोलणे या सर्व गोष्टीमुळे गणेश सर्वांच्या परिचयाचा झाला होता, काही दिवसांनी अचानक corona मुळे लागलेल्या लोकडोवन मुळे गणेशला घरूनच काम करावं लागत होता त्यामुळे ७ वाजेपर्यन्त काम करून गणेश संध्याकाळी खाली फिरायला यायला लागला होता त्यामुळे आजूबाजूचे काम करणारे देखील त्याच्या ओळखीचे झालेले, पण काही दिवसांनी लोकडोवन वाढल्यामुळे आजूबाजूचे दुकानदार देखील आता गावाला गेले होते आणि संध्याकाळी खाली फिरायला येनार गणेश हळूहळू खाली फिरायला यायचा देखील कमी झाला, फक्त जेवणासाठी आणि चहा पिण्यासाठी काम वाढल्यामुळे खाली यायचा, पुढे असेच दोन तीन महिन्यांनी जून जुलै मध्ये त्यांचं खाली येणे देखील बंद झालेलं आता रोज त्यांचा दबावाला यायचा किंवा swiggy वरून ऑर्डर आणि त्यांच्या फ्लॅटबाहेर ठेऊन जायचा, किंवा तो कधी ऑनलाईन रोजच्या गोष्टी ऑर्डर करायचा. फ्लॅट साफ करायला आलेला क्लिनर ला सुद्धा अथवा चौकीदार ला त्यांच्या फ्लॅटमधून त्यांच्या एकट्याच्या कधीतरी आवाज यायचा पण तो बाहेर निघत नव्हता, चौकीदार लोक आता विचार करायला लागले गणेश ची तब्येत तर खराब झाली नसेल ना कोणी म्हणायचं मुहूर्त न काढता घरात गेल्यामुळे त्याला वेड तर नसेल लागले ना.


असेच दिवस जात होते, ओक्टोम्बर, नोव्हेंबर, डिसेंबर लागला गणेश च खाली येणे जवळपास बंद झाले होते, एक दिवस दुपारी त्यांचा डबेवाला जो १२ वाजता डबा देऊन जायचा तो देखील नव्हता आला आणि ३ वाजले होते, गणेश देखील खाली उतरला नव्हता, चौकीदार काकांना आता गणेश ची चिंता वाटायला लागली त्यांनी न राहवून बाजूच्या एका मुलाला गणेश ला नाश्ता पाण्यासाठी काही हवाय का म्हणून विचारायला पाठवलं, लिफ्ट बंद असल्यामुळे तो मुलगा पायर्यांनी वर जात होता पण काही वेळाने अचानक ओरडत खाली आला, त्याला काय झाले म्हणून चौकीदार काका बघायला जाणार तेच एक समोरून अक्राळ विक्राळ दाढी आणि केस वाढलेला आणि जाडजूड झालेला एक मुलगा खाली येत होता, त्यांच्या वाढलेल्या दाढी आणि केस ला पाहूनच तो लहान मुलगा भिला असावा, थोडा स्पष्ट पहिला तर तो गणेशचं होता, लोकडोवन मध्ये ऑफिस च काम वाढल्यामुळे तो सकाळी उठल्यानंतर त्यांच्या लॅपटॉप समोर बसायचा आणि रात्री च काम झालं कि लॅपटॉप बंद करायचा हाच त्याचा दिनक्रम, आज त्याचा डबा न आल्यामुळे मोठ्या कष्टाने सुटी मागून तो खाली उतरला होता.


(सदर घटना पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कुठल्याही व्यक्तीशी संबंध असल्यास एक योगायोग समजावा )

:- प्रसाद पाचपांडे

Friday, 1 January 2021

सवाष्ण - असवाष्ण भेदाभेद


सवाष्ण - असवाष्ण भेदाभेद
प्रत्येकच धर्म समाजात काहीतरी अनिष्ट रूढी परंपरा पाळल्या जातात त्या हळूहळू कालानुरूप नष्ट होतात, अशीच एक आताच काळात सुद्धा सुरु असलेली अनिष्ट रूढी म्हणजे सवाष्ण - असवाष्ण भेदाभेद हा भेदभाव स्त्रियांमध्येच आजसुद्धा मुख्यतः पाळल्या जातो.

आता पहिले तर यामधला फरक समजवून घेऊ सवाष्ण म्हणजे काय जिचा पती जिवंत आहे अशा स्त्रीला सुवासिनी किंवा मराठीत सवाष्ण असे म्हटले जाते. सवाष्ण हा शब्द विवाहित स्त्री दर्शवितो आणि त्याच्या विरोधात विधवा स्त्रीची प्रतिमा उभी करतो म्हणजेच असवाष्ण.
भारतीय व्यक्ती आणि त्या सुद्धा मराठी माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आणि यात सुद्धा फक्त महिलांना साजरे करायला अनेक सण आहे, सण उत्सव साजरा केल्यामुळे लोक एकत्र येतात आनंद साजरा करतात पण ह्याच सणांमध्ये एका स्त्री ला चांगली वागणूक आणि एका स्त्रीला दुय्यम वागणूक का दिली जाते ?

आता उदाहरण द्यायचेच झाले तर हळदी कुंकू, मंगळागौर किंवा डोहाळजेवण वगैरे चा कार्यक्रमाचं, या किंवा अश्या अनेक कार्यक्रम स्त्रिया फक्त सवाष्ण स्त्रीलाच आमंत्रण देतात किंवा अश्या स्त्रियांनाच तिथे आमंत्रण दिल्या जाते ज्या सवाष्ण असतात अश्यावेळी तिथे एखादी असवाष्ण स्त्री तिथे पोहचली कि तिचा कडे वेगळ्याच नजरेने पहिल्या जाते किंवा चारचौघी मध्ये वेगळीच कुजबुज होते, एखादी स्त्री सवाष्ण नसेल तर तिला तिथे उपस्तिथ राहण्याचा हक्क सुद्धा नसावा का ?

इतर सुद्धा अनेक कार्य्रमात लग्न आणि इतर अनेक पूजे मध्ये औक्षण असो किंवा गिफ्ट म्हणजे वाण देणे असो किंवा गजरा घालणे ह्या गोष्टीचा अधिकार सुद्धा असवाष्ण स्त्रीला दिला जात नाही,एखाद्या स्त्रीला आपल्या मुलांना किंवा नातेवाईक लोकांना औक्षण करायचा अधिकार असू नये का, एखादी स्त्री सवाष्ण नाही यात त्या स्त्रीचा काय दोष असतो ?

आपण स्त्रियांचे दाखले देताना जिजामाता, राणी लक्ष्मीबाई आणि अहिल्याबाई यांचे दाखले देतो या सर्व स्त्रिया जेवढ्या त्यांचे पती असताना शूरवीर होत्या तेवढ्याच पती नसताना सुद्धा, मग जर आजसुद्धा आपण यांचे दाखले देतो तर हा भेदभाव आजसुद्धा का पाळल्या जातो ,एखाद्या व्यक्तीला फक्त तिचा सवाष्ण असण्या नसण्या वरून मान देत असू भलेही तिचं लोकांशी वागणूक योग्य असो कि अयोग्य.
सवाष्ण असवाष्ण असण्याचा आणि त्या स्त्रीचा कुठेही काहीही दोष नसतो असे असताना हि दुय्यम वागणूक २१ व्य शतकात सुद्धा का जोपासली जाते, आज स्त्रिया अंतराळात जात आहे, साक्षी मलिक पासून सायना नेहवाल पर्यंत अनेक नाव आपण खेळामध्ये घेतो मग तरीही हा भेदभाव कुठपर्यंत जोपासनार.

ज्या प्रमाणे समाजात इतर अनेक अनिष्ट प्रथा समाजातून नष्ट झाल्या त्याप्रमाणेच सवाष्ण असवाष्ण भेदभाव सुद्धा नष्ट व्हायला स्त्रियांनी पुढाकार घेणे गरजेचे, कारण एक स्त्री हि दुसऱ्या स्त्रीची आई बहीण सासू किंवा मैत्रीण नक्कीच असते, कालानुरूप बदल आणि परिवर्तन हि समाजाची गरज आहे अश्यावेळी स्त्रियांनीच या विरोधात एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे
- प्रसाद पाचपांडे
अमरावती

Friday, 31 July 2020

लोकशाहिरांच्या साहित्यातले लोकमान्य

 १ ऑगस्ट २०२०, महाराष्ट्राच्या साहित्यासाठी आणि इतिहासासाठी आजचा दिवस खूप वेगळा आहे , आज लोकमान्य टिळक यांची १०० वि पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०० वीजयंती, एक पत्रकार जहाल लेखक, गणितज्ञ, प्रखर राष्ट्रवादी, इंग्रजांनी ज्यांना भारतीय असंतोषाचे जनक असा उल्लेख केला असे लोकमान्य तर दुसरे साहित्यरत्न लोकशाहीर, संयुक्त महाराष्ट्राचा आंदोलन मध्ये ज्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले असे अण्णा भाऊ साठे, एकाची जयंती तर एकाची पुण्यतिथी.लोकमान्य टिळकांनी गीतेचा सार असणारा गीतारहस्य नावाचा अजरामर ग्रंथ लिहिला तर अण्णा भाऊ साठे यांनी फकिरा नावाची कादंबरी लिहिली.अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या ३ कवितांमध्ये लोकमान्य टिळक यांचा उल्लेख केलाय

१) गण हा काव्यप्रकार
२) महाराष्ट्राची परंपरा
३) मुंबईचा गिरणी कामगार

याच निमित्याने अण्णा भाऊ साठे यांनी त्यांचा गण या काव्यप्रकारात लोकमान्य टिळकांबद्दल त्यांचं महत्व सांगणाऱ्या काही ओळी लिहिल्या आहे त्या या निमित्याने बघू या :-

प्रथम मायभूचा चरणा
छत्रपती शिवबा चरणा
स्मरोनी गातो कवणा ||धृ ||
स्वराज्य माझा जन्मसिद्ध करुनिया गर्जना
लोक उठविला जागा केला त्या लोकमान्यांना
कठीण काळी राष्ट्रनौकाना
मार्ग दाखविला तयाना
देशा दिली ज्यांनी प्रेरणा ||१||
- अण्णा भाऊ साठे

वरील गण या काव्यप्रकारात अण्णा भाऊ साठे सर्वात पहिले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीशिवछत्रपती यांचं स्मरण करून प्रथम मायभू चा चरणा,छत्रपती शिवबा चरणा, स्मरोनी गातो कवणा म्हणजेच सर्वात पहिले मी माझी मायभूमी आणि छत्रपतींच्या शिवराय याना वंदन करतो आणि त्यांना स्मरण करून खालील गण सादर करतो .

त्यापुढील कडव्यात ते लोकमान्यांबद्दल लिहितात "स्वराज्य माझा जन्मसिद्ध करुनिया गर्जना

लोक उठविला जागा केला त्या लोकमान्यांना " कि मी छंत्रपती शिवरायांनंतर अश्या व्यक्तीला स्मरण करतो ज्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करून सर्वसामान्य लोकांना जागे केले जेणेकरून येथील लोक हे इंगरांविरोधात स्वराज्यासाठी एकत्र येतील, पुढे ते लिहितात कि "कठीण काळी राष्ट्रनौकाना, मार्ग दाखविला तयाना " या देशात जेव्हा इंग्रजविरोधात कठीण काळ होता दडपशाही होती तेव्हा येथील राष्ट्रनौकाना म्हणजेच सर्वसामान्य लोकांना स्वराज्य हा मार्ग लोकमान्य टिळक यांनी दाखविला आणि देशाला इंग्रजनविरोधात लढण्यासाठी ज्यांनी प्रेरणा दिली अशा लोकमान्य टिळक याना मी वंदन करतो, हे आहेत लोकशाहीर म्हणवल्या जाणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचे लोकमान्य टिळक यांचा बद्दल चे शब्द, आज आपण सर्व महापुरुषांची विभागणी करतो अश्या वेळी अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली हि गण कविता बराच काही सांगून जाते, जिथे आज फक्त जात पाहून महापुरुषांची जयंती साजरी केल्या अश्या आजचा महाराष्ट्राला आज या दोन्ही महापुरुषांची गरज आहे.

दुसरी कविता आहे मुंबईचा गिरणीकामगार त्यात त्यांनी लोकमान्य टिळक याना अटक केल्यावर जी स्तिथी झाली त्याविषयी अण्णा भाऊ साठे यांनी वर्णन केलाय ते बघूया:-

सन एकोणीसशे आठ साली | इंग्रजांनी भली | अटक बघा केली | टिळकांना कारागृहीं नेले

मुंबईचा कामगार खवळे | निषेध संपाचे वादळ उठले | हिंदच्या मुक्तीचे भले ||

यामध्ये १९०८ साली लोकमान्य टिळक याना अटक केल्यावर मुंबईचे गिरणी कसे खवळले आणि पुढे संप पुकारून त्यांनी निषेध व्यक्त केला हे सांगितलं आहे.

अण्णाभाऊ तिसऱ्यांदा एका पोवाड्यात लोकमान्य टिळकांचा उल्लेख केला आहे

पोवाड्याचा नाव आहे :- महाराष्ट्राची परंपरा, त्यात ते खालील प्रकारे उल्लेख करतात

टिळकांनी घालून साद सिंह उठवला

उन्मत्त गोऱ्या गजाला, निर्भय इशारा दिला||

पळ काळे कर लवलाही केसरी आला’ ॥

यात अण्णा भाऊ साठे टिळकांना सिंह म्हणतात आणि त्यांनी इंग्रजांना ना भिता केसरी मधून जे लेख लिहायचे त्याचा उल्लेख अण्णाभाऊ यांनी केलाय, अण्णाभाऊ यांचा काळ वेगळा, दृष्टिकोन वेगळा तरीही ते लोकमान्य टिळकांचा त्यांनी आपल्या कवितांमध्ये अश्या प्रकारे उल्लेख केलाय , माणूस कितीही मोठा झाला तरी इतर व्यक्तींबद्दल असलेला आदरभाव च अण्णाभाऊ साठे यांच्या वरील कवितांमध्ये दिसून येतो, आज यांचं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती तर लोकमान्य टिळक यांची १०० वी पुण्यतिथी त्यानिमित्यानी अण्णा भाऊ साठे यांनी लोकमान्य टिळक यांच्या बद्दल लिहिलेय या ओळी, दोन्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन


प्रसाद पाचपांडे

अमरावती 

Friday, 19 June 2020

मानसिक तणाव, आत्महत्या आणि जीवन


राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभाग च्या रिपोर्ट नुसार भारतात प्रत्येक दिवशी २८ लोक आत्महत्या करतात, २०१८ ला १०००० लोकांनी आत्महत्या केली तर २०१७ ला ९९०५ लोकांनी जीव दिला ( द हिंदू यांच्या बातमीनुसार), पण आपल्या सर्वसामान्य लोकांचा या घटनेकडे लक्ष तेव्हाच जाते जेव्हा सुशांत सारखा सेलेब्रेटी आपण गमावतो आणि नंतर सुरु होतात लोकांचे मोठमोठाले लेख अरे कोणाला तरी कॉल करायचा होता पासून कोणाला मोकळं बोलायचे असेल तर माझ्याशी बोलत जा इथपर्यंतची दिखावे आणि तिथून पुढे ३,४ दिवस हे पोस्ट वगैरे चालतात पण बंद होता मग परत आपण एखादा सुशांत, भैयूज्जी महाराज, पायल तडवी असो कि सागर चिंता (माझ्या जवळचा मित्र मुंबईचा ) होण्याची वाट पाहत बसतो.

sushant


तुमच्या जवळचा एक मित्र असतो, जो कंपनीत जेवताना पासून प्रत्येक गोष्टीत तुमच्या सोबत असतो, कंपनी सोडल्यावर सुद्धा दुसऱ्या गावाला जाताना तो तुम्हाला सांगून जातो आणि कंपनी सोडल्यावर अचानक एक दिवस दुसर्याकडून तुम्हाला त्याच्याविषयी कळते आणि समोरची व्यक्ती सामान्य कुठूम्बातील असल्यामुळे नाही त्यांच्या जाण्यानी कोणी त्यांनी का केलं असा विचार करत किंवा कोणी दुखी होता नाही कारण ती व्यक्ती एका सामान्य कुटुंबातील असते आणि भारतात सरासरी रोज अश्या २८ घटना घडतात.

पुण्यात एकाच कुटुंबातील ४ लोकांनी आत्महत्या केली पण त्याबद्दल समाजात कुठेच काही प्रतिक्रिया उमटली नाही, किंवा कोणालाही बोलावसं वाटलं तर माझ्याशी बोला म्हणणारे तत्सम लोक कुठेच नव्हते, सांगायचं तात्पर्य एवढाच कि अश्यावेळी कोणीही त्या व्यक्तीला साथ देत नाही याउलट एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये असेल तर त्याला निग्लेक्ट किंवा टार्गेट करण्याकडेच लोकांचा काल जास्त पाहायला मिळतो, या गोष्टीची सुरुवात शाळेपासून देखील होते एखादा मुलगा नाराज किंवा डिप्रेस दिसत असेल तर अनेकवेळा शिक्षकच त्याच कारण जाणून न घेता त्यांच्यावर वर्गात अजून अजून मस्करी करून त्याला चेष्टेचा विषय बनवतात किंवा एखादा मुलगा मुलगी जर थोडी दबावात राहत असेल तर त्या व्यक्तीची मेंटल torching किंवा harassment केल्या जाते आणि मग त्या व्यक्तीच जगन असह्य होते अगदीच याचा परिणाम त्या व्यक्तीचा अभ्यास आणि इतर गोष्टीवर होते, आणि समूहानेमिळून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणे सोपे जाते त्यामुळे इतर लोक सुद्धा अश्यावेळी त्या व्यक्तीला टार्गेट करण्याचा पाहतात.

भारतात तरुणाच्या आत्महत्या, मानसिक आरोग्य हा पुढे वाढत जाणारा एक गंभीर प्रश्न आहे त्यामुळे शिक्षणात जेव्हा मुलगा ८ वि अथवा ९ वि मध्ये जातो तेव्हा त्यांना मानसशास्त्र नावाचा एक विषय ठेवण्याची गरज आहे जेणेकरून मुलांचं प्रबोधन होईल आणि ते कोणाचं मानसिक शोषण अथवा त्यांचं कोणीही मानसिक शोषण करू शकणार नाही, पण या सोबतच गरज आहे पालकांनी आपल्या पाल्याना मानसिक दृष्टीनं खंबीर बनवण्यासोबतच त्यांना चांगली शिकवण देण्याची जेणेकरून ते या गोष्टीला बळी पडू नये आणि त्यांच्यामुळे सुद्धा कोणी या प्रकारचं पाऊल उचलू नाही.
आयुष्य हे एकदाच मिळत एकाद्या गोष्टीपासून तुम्हाला त्रास होता असेल तर ती गोष्ट सोडून द्या पण असे पर्याय उचलू नका 

:- प्रसाद पाचपांडे
   अमरावती

Friday, 20 April 2018

तुझ्या त्या प्रत्येक शब्दासाठी


तुझ्या त्या प्रत्येक शब्दासाठी
आज सुद्धा झुरतो मि
तुझ्या प्रत्येक हाके ची
वाट आज पाहतो मि

तुझ्या प्रत्येक हास्यात
गीत माझे शोधतो मि
तुझ्या प्रत्येक दुःखात
अश्रु माझे जपतो मी

चूक ती माझी होती
जी तुझ्यावर निघाली
पण आज पण त्या चुकीची
शिक्षा भोगतो मी

तुझ्या झालेल्या प्रत्येक
वेदने मधे हृदय माझे टूटत होते
फक्त तुझे मन राखण्याची
ते वाट पाहत होते

तुझ्या प्रत्येक शब्दाला
आज सुद्धा झुरतो मी
हरवलेल्या त्या आठवणी मध्ये
स्वतःला शोधतो मी

प्रसाद पाचपांडे
अमरावती/ नवी मुंबई


Wednesday, 11 April 2018

महात्मा फुले याना एक पत्रआदरणीय महात्मा फुले याना विनम्र अभिवादन , आज तुम्हाला विचार आला असेल आज याला आपली आठवण कशी काय आली , तसं तुम्ही पाहत असालच इथे निवडणूक जवळ आल्या कि इथल्या लोकांना राजकारण्यांना तुमची आठवण येतेच कि कारण येथे तुमचं नाव घेतलं आणि तुमचा फोटो बॅनर ला लावला कि इथे स्वतःला पुरोगामी म्हणवून घेता येते ,तुमचं कार्य एवढा मोठं आहे कि आजसुद्धा तुमचा नावाचा वापर करून इथे स्वतःला पुरोगामी म्हणवून घेता येते, आज या पात्राच्या निमित्याने या काही भावना तुमच्या पर्यंत पोहचवत आहे
महात्मा फुले आम्हाला माफ करा
तुम्ही इथे गोर गरीब लोकांना शिक्षण मिळावे म्हणून अनेक शाळा उघडल्या पण आज इथे तुमचा नावानी अनेकांनी इथे मोठ्या शाळा आणि शिक्षण संस्था उघडल्या आणि त्याच संस्थेमधून भरमसाठ फी आकारानं सुरु आहे ,अगदीच काय इथे शिक्षणाचं बाजारीकरण सुरु आहे.

तुम्ही ज्या भिडे वाडा मध्ये मुलीची पहिली शाळा सुरु केली त्याची अवस्था फार दयनीय झाली आहे , इथल्या राजकारण्यांना तुमचा नावाचे मोठे बॅनर लावायला वेळ आहे पण भिडे वाड्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही .

तुम्ही स्वतःच्या पत्नीला शिकवून पहिली मुख्यध्यापिका बनवून समाजासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित केला होता पण आज सुद्धा तुमचं नाव घेणारे लोक एकीकडे स्वतःच्या घरच्या स्त्रीला मात्र पदर घेऊन किंवा बुरखा घालून चौकटी च्या आतच ठेवतात , अनेकांच्या घरी आज सुद्धा मुलगा आणि मुलीच्या शिक्षण मध्ये तफावत पाहायला मिळते.

मुलींसाठी तुम्ही इथे ठिकठिकाणी शाळा उघडल्या , स्त्रियांना पुरुषांप्रमाणे शिक्षण मिळावं , समानता मिळावी म्हणून तुम्ही प्रयत्न केलेत , आमच्या साठी तुम्ही पहिले स्त्रीवादी म्हणजे फेमिनिस्ट व्यक्ती आहेत , आज मात्र इथे फेमिनीसम ची अख्खी व्याख्या च इथल्या फेमिनिस्ट लोकांनी बदलून टाकली आहे .

तुम्ही शिवरायांचं पोवाडा लिहिला पण आज तुमचा पूर्ण पोवाडा न वाचता एका शब्दावरून निष्कर्ष काढणारे अनेक लोक आहेत.

तुमचं  नाव घेऊन काही लोक इथे द्वेष पसरवण्याचं सुद्धा काम करतात पण कदाचित ते हे विसरले कि ज्यांचा विरुद्ध ते द्वेष पसरवत त्याच समाजातील मुलगा तुम्ही दत्तक घेतला होता .
अजून सुद्धा बरंच काही सांगायचं पण तूर्तास एवढंच , शेवटी एवढंच सांगावं वाटते तुमचा नावाचा लोकांनी फक्त राजकारण पुरता न करता तुमचं शिक्षणाचं कार्य पुढे नेण्याकरिता अखंड करावा
तुमच्याच महाराष्ट्रातील एक तरुण

Sunday, 11 February 2018

प्रेम आणि भावना

आजकाल बरेच जन येथे प्रेमावर लिहितात तर अनेक लोकांना येथे सिम्पल सिम्पल हवी असे म्हणनारे सुद्धा बरेच् आहे
मी कॉलेज मधे असताना त्या काळी तरुणां मधे असणार प्रेम हे जगजीत सिंह यांच्या होश वालो को खबर नाही या गाण्या सारखा असायचं  आणि जो संपायचं  ते ' हम लबो से कह न पाये उनसे हाले दिल कभी और वे समझे नाही ये खामोशी क्या चीझ है' . आजकाल प्रेमाची व्याख्या बदलली आहे पहिल्या दिवशी भेट होते आणि दुसऱ्या दिवशी प्रोपोज़ तिसऱ्या दिवशी break up . पण पहिल्या दिवशी भेट झालेल्या माणसाला दुसऱ्या दिवशी प्रेम झाल यात प्रेम असत का? एका व्यक्ति ला जाणून घेण्याकरिता  किवा स्वभाव समजण्याकरिता कमित कमी 2-3 भेटी तरी आवश्यक असतात पण एका दिवसात किवा भेट न होता ही प्रेम होने हे शक्य आहे का कदाचित आजची पीढ़ी ही attraction  ला च प्रेम समजत असावी आणि त्यमागे गुरफटुन गेलि असावी
प्रेम ही एक नाजुक भावना असते जी हळूहळू फुलत जाते ,आपण ज्या व्यक्तिवर प्रेम करतो त्याला आपण प्रेम व्यक्त करायची पण गरज नसते अनेक वेळा न सांगता देखील समोरच्या ला ते कळून चूकते रोज एकमेकांशि भांडणारे किवा 2 दिवस दूर गेले की त्याना दुरावा जाणवू लागतो आणि कळते ते प्रेम अगदी 2 प्रेम करणारे व्यक्ति एकमेकांसोबत रोज भांडणारे मात्र 4 चौघात आपल्या आवडत्या व्यक्ति मागे त्याचा बद्दल चांगलेच बोलताना दिसतात आणि हळुवार फुलत जाणार प्रेम हे आयुष्यभरासाठी असत अगदी
कुसुमाग्रज यांच्या खालील ओळी प्रमाणे असत:
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस,
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं!
शब्दांकन 
प्रसाद पाचपांडे
अमरावती /नवी मुंबई