Wednesday 3 March 2021

लॉकडाउन मधील एक हॉरर कथा

 गणेश एका नामांकित संगणक कंपनी मध्ये काम करणारा मुलगा, फॉर्मल शर्ट, काळे शूझ घालून सकाळी ९ वाजता ऑफिस साठी निघणारा व रात्री ७-८ वाजता घरी येणार एक साधारण मुलगा, सकाळी रूम वरून निघाल्यावर मित्रांसोबत चहा पिणे आणि मग ऑफिस ला जाणे आणि ऑफिस वरून आल्यावर मित्रांसोबत रात्री जेवण करणे आणि webseries बघणे हा त्याचा नित्यक्रम.



२०२० च्या नवीन वर्षात नुकताच गणेश ने त्यांच्या संगणक कंपनी जवळ लाँच झालेल्या टाउनशिप मध्ये एक फ्लॅट घेतला, टाउनशिप नुकतीच लाँच झाल्याने त्या एरिया च्या आसपास तशी विरळ वस्तीच होती आणि काही थोडेफार दुकान , त्याला फेब्रुवारी च्या आसपास त्या फ्लॅट च possession देखील मिळालं, अनेकांना गणेश प्रमाणे possession मिळालं होता पण त्यातील काही लोक दुसरीकडे राहत होते तर काही लग्न झालेले असल्यामुळे मुहूर्त आणि वास्तुशांती करून येणार होते, गणेश मात्र बॅचलर आणि त्यात IT Engineer असल्यामुळे भाड्याचे पैसे उगाच देण्यापेक्षा स्वतःच्या फ्लॅट मध्ये राहावं या उद्देश्याने राहायला आला.

गणेश चा स्वभाव हा कामापुरता बोलणारा असला तरी येता जात सोसायटी च्या चौकीदार, चहा वाला, दुकानदार यांच्याकडे पाहून हसणे आणि काय दादा वगैरे बोलणे या सर्व गोष्टीमुळे गणेश सर्वांच्या परिचयाचा झाला होता, काही दिवसांनी अचानक corona मुळे लागलेल्या लोकडोवन मुळे गणेशला घरूनच काम करावं लागत होता त्यामुळे ७ वाजेपर्यन्त काम करून गणेश संध्याकाळी खाली फिरायला यायला लागला होता त्यामुळे आजूबाजूचे काम करणारे देखील त्याच्या ओळखीचे झालेले, पण काही दिवसांनी लोकडोवन वाढल्यामुळे आजूबाजूचे दुकानदार देखील आता गावाला गेले होते आणि संध्याकाळी खाली फिरायला येनार गणेश हळूहळू खाली फिरायला यायचा देखील कमी झाला, फक्त जेवणासाठी आणि चहा पिण्यासाठी काम वाढल्यामुळे खाली यायचा, पुढे असेच दोन तीन महिन्यांनी जून जुलै मध्ये त्यांचं खाली येणे देखील बंद झालेलं आता रोज त्यांचा दबावाला यायचा किंवा swiggy वरून ऑर्डर आणि त्यांच्या फ्लॅटबाहेर ठेऊन जायचा, किंवा तो कधी ऑनलाईन रोजच्या गोष्टी ऑर्डर करायचा. फ्लॅट साफ करायला आलेला क्लिनर ला सुद्धा अथवा चौकीदार ला त्यांच्या फ्लॅटमधून त्यांच्या एकट्याच्या कधीतरी आवाज यायचा पण तो बाहेर निघत नव्हता, चौकीदार लोक आता विचार करायला लागले गणेश ची तब्येत तर खराब झाली नसेल ना कोणी म्हणायचं मुहूर्त न काढता घरात गेल्यामुळे त्याला वेड तर नसेल लागले ना.


असेच दिवस जात होते, ओक्टोम्बर, नोव्हेंबर, डिसेंबर लागला गणेश च खाली येणे जवळपास बंद झाले होते, एक दिवस दुपारी त्यांचा डबेवाला जो १२ वाजता डबा देऊन जायचा तो देखील नव्हता आला आणि ३ वाजले होते, गणेश देखील खाली उतरला नव्हता, चौकीदार काकांना आता गणेश ची चिंता वाटायला लागली त्यांनी न राहवून बाजूच्या एका मुलाला गणेश ला नाश्ता पाण्यासाठी काही हवाय का म्हणून विचारायला पाठवलं, लिफ्ट बंद असल्यामुळे तो मुलगा पायर्यांनी वर जात होता पण काही वेळाने अचानक ओरडत खाली आला, त्याला काय झाले म्हणून चौकीदार काका बघायला जाणार तेच एक समोरून अक्राळ विक्राळ दाढी आणि केस वाढलेला आणि जाडजूड झालेला एक मुलगा खाली येत होता, त्यांच्या वाढलेल्या दाढी आणि केस ला पाहूनच तो लहान मुलगा भिला असावा, थोडा स्पष्ट पहिला तर तो गणेशचं होता, लोकडोवन मध्ये ऑफिस च काम वाढल्यामुळे तो सकाळी उठल्यानंतर त्यांच्या लॅपटॉप समोर बसायचा आणि रात्री च काम झालं कि लॅपटॉप बंद करायचा हाच त्याचा दिनक्रम, आज त्याचा डबा न आल्यामुळे मोठ्या कष्टाने सुटी मागून तो खाली उतरला होता.


(सदर घटना पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कुठल्याही व्यक्तीशी संबंध असल्यास एक योगायोग समजावा )

:- प्रसाद पाचपांडे

Friday 1 January 2021

सवाष्ण - असवाष्ण भेदाभेद


सवाष्ण - असवाष्ण भेदाभेद
प्रत्येकच धर्म समाजात काहीतरी अनिष्ट रूढी परंपरा पाळल्या जातात त्या हळूहळू कालानुरूप नष्ट होतात, अशीच एक आताच काळात सुद्धा सुरु असलेली अनिष्ट रूढी म्हणजे सवाष्ण - असवाष्ण भेदाभेद हा भेदभाव स्त्रियांमध्येच आजसुद्धा मुख्यतः पाळल्या जातो.

आता पहिले तर यामधला फरक समजवून घेऊ सवाष्ण म्हणजे काय जिचा पती जिवंत आहे अशा स्त्रीला सुवासिनी किंवा मराठीत सवाष्ण असे म्हटले जाते. सवाष्ण हा शब्द विवाहित स्त्री दर्शवितो आणि त्याच्या विरोधात विधवा स्त्रीची प्रतिमा उभी करतो म्हणजेच असवाष्ण.
भारतीय व्यक्ती आणि त्या सुद्धा मराठी माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आणि यात सुद्धा फक्त महिलांना साजरे करायला अनेक सण आहे, सण उत्सव साजरा केल्यामुळे लोक एकत्र येतात आनंद साजरा करतात पण ह्याच सणांमध्ये एका स्त्री ला चांगली वागणूक आणि एका स्त्रीला दुय्यम वागणूक का दिली जाते ?

आता उदाहरण द्यायचेच झाले तर हळदी कुंकू, मंगळागौर किंवा डोहाळजेवण वगैरे चा कार्यक्रमाचं, या किंवा अश्या अनेक कार्यक्रम स्त्रिया फक्त सवाष्ण स्त्रीलाच आमंत्रण देतात किंवा अश्या स्त्रियांनाच तिथे आमंत्रण दिल्या जाते ज्या सवाष्ण असतात अश्यावेळी तिथे एखादी असवाष्ण स्त्री तिथे पोहचली कि तिचा कडे वेगळ्याच नजरेने पहिल्या जाते किंवा चारचौघी मध्ये वेगळीच कुजबुज होते, एखादी स्त्री सवाष्ण नसेल तर तिला तिथे उपस्तिथ राहण्याचा हक्क सुद्धा नसावा का ?

इतर सुद्धा अनेक कार्य्रमात लग्न आणि इतर अनेक पूजे मध्ये औक्षण असो किंवा गिफ्ट म्हणजे वाण देणे असो किंवा गजरा घालणे ह्या गोष्टीचा अधिकार सुद्धा असवाष्ण स्त्रीला दिला जात नाही,एखाद्या स्त्रीला आपल्या मुलांना किंवा नातेवाईक लोकांना औक्षण करायचा अधिकार असू नये का, एखादी स्त्री सवाष्ण नाही यात त्या स्त्रीचा काय दोष असतो ?

आपण स्त्रियांचे दाखले देताना जिजामाता, राणी लक्ष्मीबाई आणि अहिल्याबाई यांचे दाखले देतो या सर्व स्त्रिया जेवढ्या त्यांचे पती असताना शूरवीर होत्या तेवढ्याच पती नसताना सुद्धा, मग जर आजसुद्धा आपण यांचे दाखले देतो तर हा भेदभाव आजसुद्धा का पाळल्या जातो ,एखाद्या व्यक्तीला फक्त तिचा सवाष्ण असण्या नसण्या वरून मान देत असू भलेही तिचं लोकांशी वागणूक योग्य असो कि अयोग्य.
सवाष्ण असवाष्ण असण्याचा आणि त्या स्त्रीचा कुठेही काहीही दोष नसतो असे असताना हि दुय्यम वागणूक २१ व्य शतकात सुद्धा का जोपासली जाते, आज स्त्रिया अंतराळात जात आहे, साक्षी मलिक पासून सायना नेहवाल पर्यंत अनेक नाव आपण खेळामध्ये घेतो मग तरीही हा भेदभाव कुठपर्यंत जोपासनार.

ज्या प्रमाणे समाजात इतर अनेक अनिष्ट प्रथा समाजातून नष्ट झाल्या त्याप्रमाणेच सवाष्ण असवाष्ण भेदभाव सुद्धा नष्ट व्हायला स्त्रियांनी पुढाकार घेणे गरजेचे, कारण एक स्त्री हि दुसऱ्या स्त्रीची आई बहीण सासू किंवा मैत्रीण नक्कीच असते, कालानुरूप बदल आणि परिवर्तन हि समाजाची गरज आहे अश्यावेळी स्त्रियांनीच या विरोधात एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे
- प्रसाद पाचपांडे
अमरावती