Sunday, 28 June 2026

विदर्भातील पारंपरिक पदार्थांचा खरा आनंद घ्यायचा असेल तर शेगावचा स्वाद या हॉटेलला भेट द्या



पुण्यात नुकताच उघडलेलं शेगावचा स्वाद हे हॉटेल म्हणजे विदर्भ वासियांसाठी एक पर्वणीच आहे, नुकताच काही दिवस आधी विदर्भाची खासियत असलेल्या रोडग्याची आठवण अली आणि म्हणून शेअरच करतो आणि बघतो तर पुण्यात अस्सल रोडगे निघाले म्हणून त्यांना कॉल केला तर ते विदर्भातील अंजनगाव सुर्जी येथील निघाले.




तिथे गेल्यावर त्यांनी आम्हाला अमरावतीची अस्सल संभारवाडी दाखवली, कितीतरी दिवसांनी अशी संभारवाडी खायला मिळाली, अस्सल वर्हाडी चवीची संभारवाडी होती, मग त्यानंतर त्यांच्याकडील इत मेनू बघितले त्यात खालील पैकी काही मेनू होते, ज्यात

1)विदर्भाची झुणका भाकरी

2)मिरचीची भाजी

3)आलू बोन्डा आणि रस्सा

4)कधी गोळे आणि वांग्याचं भारी

5)रोडगे आणि रस्सा भाजी

त्यानंतर आम्ही त्यातला रोडगे ची ऑर्डर केली, 2 लोक सहज खाऊ शकतील असा मोठा रोडगा होता आणि झणझणीत वांग्याची भाजी आणि तीच विदर्भाची चव.


आपण पुण्यात आणि विदर्भ बाहेर जरी असलो आणि आपल्याला विदर्भाची चव चाखायची असेल तर या हॉटेल ला नक्की भेट देता येईल

पत्ता :- शेगावचा स्वाद (Shegaoncha Swaad) चा अचूक पत्ता खालीलप्रमाणे आहे:

शॉप नं. २, संयोग डेव्हलपर्स बिल्डिंग,

म्हाडाजवळ, पिंपळे सौदागर रोड,

पिंपरी गाव, पुणे - 41111


Wednesday, 24 June 2026

प्रणित मोरे शो तील अश्लीलतेवरून सोशल मीडियावर उठलेले वादळ

प्रणित मोरे खरच कॉमेडी नावाखाली अश्लीलता पसरवत आहे का? बिग बॉस गाजवल्यानंतर प्रणित मोरे नी त्याचा नवीन कॉमेडी शो सुरू केला आणि बिग बॉस मध्ये गेल्यानंतर त्याचा शो अर्थातच पॉप्युलर देखील झाला पण तिथे कॉमेडी पेक्षा जास्त अश्लील आणि कमरेखालच्या जोक्स मुळे अनेकदा टीका देखील झाली, आता नुकत्याच झालेल्या दोन घटनांमुळे प्रणित मोरेला त्याचा शो बंद करण्याचे आणि त्याचा अकाउंट deactivated करण्याची वेळ देखील आली, त्यातली पहिली घटना म्हणजे हिमांशू जांगडा नावाच्या मुलाने डेटिंग वरची गोष्ट सांगताना हे सांगितले की त्यांनी एका मुलीवर कशाप्रकारे 370 रुपये खर्च केले आणि ते खर्च केलेले पैसे रिटर्न घेण्यासाठी त्याने तिच्या फिजिकल रिलेशन केले होते किंवा खोटी पण त्याने गेलेले वाक्य चुकीचं होतं आणि त्याच्यासाठी त्याच्यावर भरपूर टीका झाली अगदीच त्याच्यामुळे अनेकांनी पुरुषांवर देखील टीका केली हे सर्वच मुलं वाईट आहे यापासून टीका झाली आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन त्याच्यावर त्याचा जॉब देखील गेला.

पण याहीपेक्षा वाईट गोष्ट यापुढे आहे सेजल पवार नावाची मुलगी जेव्हा मिळालेल्या डेथ बॉडी बद्दल बोलली त्यांच्या गुप्तांगाबद्दल बोलली त्यावरून देखील टीका सुरू आहे कारण जेव्हा कोणी आपल्या परिवारातील व्यक्तीचे डेड बॉडी दान देतो किंवा शरीर दान देतो तेव्हा ते इमोशनल होऊन देता कारण ती फक्त एक मृता शरीर नसते तर त्यामागे असतात भावना आणि यामुळेच दान देणाऱ्या व्यक्तींच्या भावना देखील दुखल्या आहेत, पुढे जाऊन तिने याबद्दल माफी देखील मागितली आहे, सेजल आणि हिमांशू हे दोघं दोषी तर आहेच पण त्याहीपेक्षा जास्त दोषी हा प्रणित मोरे आहे तो यांना असे बोलायला provoke करतो, एखाद्याने एखादी गोष्ट करण्यापेक्षा कधीकधी त्या व्यक्तीला provoke करणारा देखील जास्त गुन्हेगार असतो, कदाचित त्यामुळेच आजचे शो फॅमिली पाहण्यासारखे नसतात, कार्यकारी टीव्ही वरची आणि कॉमेडी शो कपिल शर्मा सुनील पाल ते जॉनी लिव्हर अशा लोकांनी गाजवले आणि ते घरोघरी फॅमिली सहित देखील बघितले जायचे पण आता यामुळे खरंच कॉमेडी शो चा दर्जा खालावला आहे का हा प्रश्न पडतो, जर डॉक्टरच अशा असंवेदनशील असेल किंवा त्यांनी केलं असेल किंवा नसेलही पण असा संदेश मात्र या कॉमेडी शो च्या माध्यमातून लोकांमध्ये जातो,
तुमचं काय मत आहे असे शो असावेत की अशा शो मुळे कॉमेडीचा दर्जा घसरतोय??

Wednesday, 3 March 2021

लॉकडाउन मधील एक हॉरर कथा

 गणेश एका नामांकित संगणक कंपनी मध्ये काम करणारा मुलगा, फॉर्मल शर्ट, काळे शूझ घालून सकाळी ९ वाजता ऑफिस साठी निघणारा व रात्री ७-८ वाजता घरी येणार एक साधारण मुलगा, सकाळी रूम वरून निघाल्यावर मित्रांसोबत चहा पिणे आणि मग ऑफिस ला जाणे आणि ऑफिस वरून आल्यावर मित्रांसोबत रात्री जेवण करणे आणि webseries बघणे हा त्याचा नित्यक्रम.



२०२० च्या नवीन वर्षात नुकताच गणेश ने त्यांच्या संगणक कंपनी जवळ लाँच झालेल्या टाउनशिप मध्ये एक फ्लॅट घेतला, टाउनशिप नुकतीच लाँच झाल्याने त्या एरिया च्या आसपास तशी विरळ वस्तीच होती आणि काही थोडेफार दुकान , त्याला फेब्रुवारी च्या आसपास त्या फ्लॅट च possession देखील मिळालं, अनेकांना गणेश प्रमाणे possession मिळालं होता पण त्यातील काही लोक दुसरीकडे राहत होते तर काही लग्न झालेले असल्यामुळे मुहूर्त आणि वास्तुशांती करून येणार होते, गणेश मात्र बॅचलर आणि त्यात IT Engineer असल्यामुळे भाड्याचे पैसे उगाच देण्यापेक्षा स्वतःच्या फ्लॅट मध्ये राहावं या उद्देश्याने राहायला आला.

गणेश चा स्वभाव हा कामापुरता बोलणारा असला तरी येता जात सोसायटी च्या चौकीदार, चहा वाला, दुकानदार यांच्याकडे पाहून हसणे आणि काय दादा वगैरे बोलणे या सर्व गोष्टीमुळे गणेश सर्वांच्या परिचयाचा झाला होता, काही दिवसांनी अचानक corona मुळे लागलेल्या लोकडोवन मुळे गणेशला घरूनच काम करावं लागत होता त्यामुळे ७ वाजेपर्यन्त काम करून गणेश संध्याकाळी खाली फिरायला यायला लागला होता त्यामुळे आजूबाजूचे काम करणारे देखील त्याच्या ओळखीचे झालेले, पण काही दिवसांनी लोकडोवन वाढल्यामुळे आजूबाजूचे दुकानदार देखील आता गावाला गेले होते आणि संध्याकाळी खाली फिरायला येनार गणेश हळूहळू खाली फिरायला यायचा देखील कमी झाला, फक्त जेवणासाठी आणि चहा पिण्यासाठी काम वाढल्यामुळे खाली यायचा, पुढे असेच दोन तीन महिन्यांनी जून जुलै मध्ये त्यांचं खाली येणे देखील बंद झालेलं आता रोज त्यांचा दबावाला यायचा किंवा swiggy वरून ऑर्डर आणि त्यांच्या फ्लॅटबाहेर ठेऊन जायचा, किंवा तो कधी ऑनलाईन रोजच्या गोष्टी ऑर्डर करायचा. फ्लॅट साफ करायला आलेला क्लिनर ला सुद्धा अथवा चौकीदार ला त्यांच्या फ्लॅटमधून त्यांच्या एकट्याच्या कधीतरी आवाज यायचा पण तो बाहेर निघत नव्हता, चौकीदार लोक आता विचार करायला लागले गणेश ची तब्येत तर खराब झाली नसेल ना कोणी म्हणायचं मुहूर्त न काढता घरात गेल्यामुळे त्याला वेड तर नसेल लागले ना.


असेच दिवस जात होते, ओक्टोम्बर, नोव्हेंबर, डिसेंबर लागला गणेश च खाली येणे जवळपास बंद झाले होते, एक दिवस दुपारी त्यांचा डबेवाला जो १२ वाजता डबा देऊन जायचा तो देखील नव्हता आला आणि ३ वाजले होते, गणेश देखील खाली उतरला नव्हता, चौकीदार काकांना आता गणेश ची चिंता वाटायला लागली त्यांनी न राहवून बाजूच्या एका मुलाला गणेश ला नाश्ता पाण्यासाठी काही हवाय का म्हणून विचारायला पाठवलं, लिफ्ट बंद असल्यामुळे तो मुलगा पायर्यांनी वर जात होता पण काही वेळाने अचानक ओरडत खाली आला, त्याला काय झाले म्हणून चौकीदार काका बघायला जाणार तेच एक समोरून अक्राळ विक्राळ दाढी आणि केस वाढलेला आणि जाडजूड झालेला एक मुलगा खाली येत होता, त्यांच्या वाढलेल्या दाढी आणि केस ला पाहूनच तो लहान मुलगा भिला असावा, थोडा स्पष्ट पहिला तर तो गणेशचं होता, लोकडोवन मध्ये ऑफिस च काम वाढल्यामुळे तो सकाळी उठल्यानंतर त्यांच्या लॅपटॉप समोर बसायचा आणि रात्री च काम झालं कि लॅपटॉप बंद करायचा हाच त्याचा दिनक्रम, आज त्याचा डबा न आल्यामुळे मोठ्या कष्टाने सुटी मागून तो खाली उतरला होता.


(सदर घटना पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा कुठल्याही व्यक्तीशी संबंध असल्यास एक योगायोग समजावा )

:- प्रसाद पाचपांडे

Friday, 1 January 2021

सवाष्ण - असवाष्ण भेदाभेद


सवाष्ण - असवाष्ण भेदाभेद
प्रत्येकच धर्म समाजात काहीतरी अनिष्ट रूढी परंपरा पाळल्या जातात त्या हळूहळू कालानुरूप नष्ट होतात, अशीच एक आताच काळात सुद्धा सुरु असलेली अनिष्ट रूढी म्हणजे सवाष्ण - असवाष्ण भेदाभेद हा भेदभाव स्त्रियांमध्येच आजसुद्धा मुख्यतः पाळल्या जातो.

आता पहिले तर यामधला फरक समजवून घेऊ सवाष्ण म्हणजे काय जिचा पती जिवंत आहे अशा स्त्रीला सुवासिनी किंवा मराठीत सवाष्ण असे म्हटले जाते. सवाष्ण हा शब्द विवाहित स्त्री दर्शवितो आणि त्याच्या विरोधात विधवा स्त्रीची प्रतिमा उभी करतो म्हणजेच असवाष्ण.
भारतीय व्यक्ती आणि त्या सुद्धा मराठी माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आणि यात सुद्धा फक्त महिलांना साजरे करायला अनेक सण आहे, सण उत्सव साजरा केल्यामुळे लोक एकत्र येतात आनंद साजरा करतात पण ह्याच सणांमध्ये एका स्त्री ला चांगली वागणूक आणि एका स्त्रीला दुय्यम वागणूक का दिली जाते ?

आता उदाहरण द्यायचेच झाले तर हळदी कुंकू, मंगळागौर किंवा डोहाळजेवण वगैरे चा कार्यक्रमाचं, या किंवा अश्या अनेक कार्यक्रम स्त्रिया फक्त सवाष्ण स्त्रीलाच आमंत्रण देतात किंवा अश्या स्त्रियांनाच तिथे आमंत्रण दिल्या जाते ज्या सवाष्ण असतात अश्यावेळी तिथे एखादी असवाष्ण स्त्री तिथे पोहचली कि तिचा कडे वेगळ्याच नजरेने पहिल्या जाते किंवा चारचौघी मध्ये वेगळीच कुजबुज होते, एखादी स्त्री सवाष्ण नसेल तर तिला तिथे उपस्तिथ राहण्याचा हक्क सुद्धा नसावा का ?

इतर सुद्धा अनेक कार्य्रमात लग्न आणि इतर अनेक पूजे मध्ये औक्षण असो किंवा गिफ्ट म्हणजे वाण देणे असो किंवा गजरा घालणे ह्या गोष्टीचा अधिकार सुद्धा असवाष्ण स्त्रीला दिला जात नाही,एखाद्या स्त्रीला आपल्या मुलांना किंवा नातेवाईक लोकांना औक्षण करायचा अधिकार असू नये का, एखादी स्त्री सवाष्ण नाही यात त्या स्त्रीचा काय दोष असतो ?

आपण स्त्रियांचे दाखले देताना जिजामाता, राणी लक्ष्मीबाई आणि अहिल्याबाई यांचे दाखले देतो या सर्व स्त्रिया जेवढ्या त्यांचे पती असताना शूरवीर होत्या तेवढ्याच पती नसताना सुद्धा, मग जर आजसुद्धा आपण यांचे दाखले देतो तर हा भेदभाव आजसुद्धा का पाळल्या जातो ,एखाद्या व्यक्तीला फक्त तिचा सवाष्ण असण्या नसण्या वरून मान देत असू भलेही तिचं लोकांशी वागणूक योग्य असो कि अयोग्य.
सवाष्ण असवाष्ण असण्याचा आणि त्या स्त्रीचा कुठेही काहीही दोष नसतो असे असताना हि दुय्यम वागणूक २१ व्य शतकात सुद्धा का जोपासली जाते, आज स्त्रिया अंतराळात जात आहे, साक्षी मलिक पासून सायना नेहवाल पर्यंत अनेक नाव आपण खेळामध्ये घेतो मग तरीही हा भेदभाव कुठपर्यंत जोपासनार.

ज्या प्रमाणे समाजात इतर अनेक अनिष्ट प्रथा समाजातून नष्ट झाल्या त्याप्रमाणेच सवाष्ण असवाष्ण भेदभाव सुद्धा नष्ट व्हायला स्त्रियांनी पुढाकार घेणे गरजेचे, कारण एक स्त्री हि दुसऱ्या स्त्रीची आई बहीण सासू किंवा मैत्रीण नक्कीच असते, कालानुरूप बदल आणि परिवर्तन हि समाजाची गरज आहे अश्यावेळी स्त्रियांनीच या विरोधात एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे
- प्रसाद पाचपांडे
अमरावती

Friday, 31 July 2020

लोकशाहिरांच्या साहित्यातले लोकमान्य

 १ ऑगस्ट  महाराष्ट्राच्या साहित्यासाठी आणि इतिहासासाठी आजचा दिवस खूप वेगळा आहे , आज लोकमान्य टिळक यांची  पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती, एक पत्रकार जहाल लेखक, गणितज्ञ, प्रखर राष्ट्रवादी, इंग्रजांनी ज्यांना भारतीय असंतोषाचे जनक असा उल्लेख केला असे लोकमान्य तर दुसरे साहित्यरत्न लोकशाहीर, संयुक्त महाराष्ट्राचा आंदोलन मध्ये ज्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले असे अण्णा भाऊ साठे, एकाची जयंती तर एकाची पुण्यतिथी.



लोकमान्य टिळकांनी गीतेचा सार असणारा गीतारहस्य नावाचा अजरामर ग्रंथ लिहिला तर अण्णा भाऊ साठे यांनी फकिरा नावाची कादंबरी लिहिली.अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या ३ कवितांमध्ये लोकमान्य टिळक यांचा उल्लेख केलाय

१) गण हा काव्यप्रकार
२) महाराष्ट्राची परंपरा
३) मुंबईचा गिरणी कामगार

याच निमित्याने अण्णा भाऊ साठे यांनी त्यांचा गण या काव्यप्रकारात लोकमान्य टिळकांबद्दल त्यांचं महत्व सांगणाऱ्या काही ओळी लिहिल्या आहे त्या या निमित्याने बघू या :-

प्रथम मायभूचा चरणा
छत्रपती शिवबा चरणा
स्मरोनी गातो कवणा ||धृ ||
स्वराज्य माझा जन्मसिद्ध करुनिया गर्जना
लोक उठविला जागा केला त्या लोकमान्यांना
कठीण काळी राष्ट्रनौकाना
मार्ग दाखविला तयाना
देशा दिली ज्यांनी प्रेरणा ||१||
- अण्णा भाऊ साठे

वरील गण या काव्यप्रकारात अण्णा भाऊ साठे सर्वात पहिले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीशिवछत्रपती यांचं स्मरण करून प्रथम मायभू चा चरणा,छत्रपती शिवबा चरणा, स्मरोनी गातो कवणा म्हणजेच सर्वात पहिले मी माझी मायभूमी आणि छत्रपतींच्या शिवराय याना वंदन करतो आणि त्यांना स्मरण करून खालील गण सादर करतो .

त्यापुढील कडव्यात ते लोकमान्यांबद्दल लिहितात "स्वराज्य माझा जन्मसिद्ध करुनिया गर्जना

लोक उठविला जागा केला त्या लोकमान्यांना " कि मी छंत्रपती शिवरायांनंतर अश्या व्यक्तीला स्मरण करतो ज्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करून सर्वसामान्य लोकांना जागे केले जेणेकरून येथील लोक हे इंगरांविरोधात स्वराज्यासाठी एकत्र येतील, पुढे ते लिहितात कि "कठीण काळी राष्ट्रनौकाना, मार्ग दाखविला तयाना " या देशात जेव्हा इंग्रजविरोधात कठीण काळ होता दडपशाही होती तेव्हा येथील राष्ट्रनौकाना म्हणजेच सर्वसामान्य लोकांना स्वराज्य हा मार्ग लोकमान्य टिळक यांनी दाखविला आणि देशाला इंग्रजनविरोधात लढण्यासाठी ज्यांनी प्रेरणा दिली अशा लोकमान्य टिळक याना मी वंदन करतो, हे आहेत लोकशाहीर म्हणवल्या जाणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचे लोकमान्य टिळक यांचा बद्दल चे शब्द, आज आपण सर्व महापुरुषांची विभागणी करतो अश्या वेळी अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली हि गण कविता बराच काही सांगून जाते, जिथे आज फक्त जात पाहून महापुरुषांची जयंती साजरी केल्या अश्या आजचा महाराष्ट्राला आज या दोन्ही महापुरुषांची गरज आहे.

दुसरी कविता आहे मुंबईचा गिरणीकामगार त्यात त्यांनी लोकमान्य टिळक याना अटक केल्यावर जी स्तिथी झाली त्याविषयी अण्णा भाऊ साठे यांनी वर्णन केलाय ते बघूया:-

सन एकोणीसशे आठ साली | इंग्रजांनी भली | अटक बघा केली | टिळकांना कारागृहीं नेले

मुंबईचा कामगार खवळे | निषेध संपाचे वादळ उठले | हिंदच्या मुक्तीचे भले ||

यामध्ये १९०८ साली लोकमान्य टिळक याना अटक केल्यावर मुंबईचे गिरणी कसे खवळले आणि पुढे संप पुकारून त्यांनी निषेध व्यक्त केला हे सांगितलं आहे.

अण्णाभाऊ तिसऱ्यांदा एका पोवाड्यात लोकमान्य टिळकांचा उल्लेख केला आहे

पोवाड्याचा नाव आहे :- महाराष्ट्राची परंपरा, त्यात ते खालील प्रकारे उल्लेख करतात

टिळकांनी घालून साद सिंह उठवला

उन्मत्त गोऱ्या गजाला, निर्भय इशारा दिला||

पळ काळे कर लवलाही केसरी आला’ ॥

यात अण्णा भाऊ साठे टिळकांना सिंह म्हणतात आणि त्यांनी इंग्रजांना ना भिता केसरी मधून जे लेख लिहायचे त्याचा उल्लेख अण्णाभाऊ यांनी केलाय, अण्णाभाऊ यांचा काळ वेगळा, दृष्टिकोन वेगळा तरीही ते लोकमान्य टिळकांचा त्यांनी आपल्या कवितांमध्ये अश्या प्रकारे उल्लेख केलाय , माणूस कितीही मोठा झाला तरी इतर व्यक्तींबद्दल असलेला आदरभाव च अण्णाभाऊ साठे यांच्या वरील कवितांमध्ये दिसून येतो, आज यांचं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती तर लोकमान्य टिळक यांची १०० वी पुण्यतिथी त्यानिमित्यानी अण्णा भाऊ साठे यांनी लोकमान्य टिळक यांच्या बद्दल लिहिलेय या ओळी, दोन्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन


प्रसाद पाचपांडे

अमरावती 

Friday, 19 June 2020

मानसिक तणाव, आत्महत्या आणि जीवन


राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभाग च्या रिपोर्ट नुसार भारतात प्रत्येक दिवशी २८ लोक आत्महत्या करतात, २०१८ ला १०००० लोकांनी आत्महत्या केली तर २०१७ ला ९९०५ लोकांनी जीव दिला ( द हिंदू यांच्या बातमीनुसार), पण आपल्या सर्वसामान्य लोकांचा या घटनेकडे लक्ष तेव्हाच जाते जेव्हा सुशांत सारखा सेलेब्रेटी आपण गमावतो आणि नंतर सुरु होतात लोकांचे मोठमोठाले लेख अरे कोणाला तरी कॉल करायचा होता पासून कोणाला मोकळं बोलायचे असेल तर माझ्याशी बोलत जा इथपर्यंतची दिखावे आणि तिथून पुढे ३,४ दिवस हे पोस्ट वगैरे चालतात पण बंद होता मग परत आपण एखादा सुशांत, भैयूज्जी महाराज, पायल तडवी असो कि सागर चिंता (माझ्या जवळचा मित्र मुंबईचा ) होण्याची वाट पाहत बसतो.

sushant


तुमच्या जवळचा एक मित्र असतो, जो कंपनीत जेवताना पासून प्रत्येक गोष्टीत तुमच्या सोबत असतो, कंपनी सोडल्यावर सुद्धा दुसऱ्या गावाला जाताना तो तुम्हाला सांगून जातो आणि कंपनी सोडल्यावर अचानक एक दिवस दुसर्याकडून तुम्हाला त्याच्याविषयी कळते आणि समोरची व्यक्ती सामान्य कुठूम्बातील असल्यामुळे नाही त्यांच्या जाण्यानी कोणी त्यांनी का केलं असा विचार करत किंवा कोणी दुखी होता नाही कारण ती व्यक्ती एका सामान्य कुटुंबातील असते आणि भारतात सरासरी रोज अश्या २८ घटना घडतात.





पुण्यात एकाच कुटुंबातील ४ लोकांनी आत्महत्या केली पण त्याबद्दल समाजात कुठेच काही प्रतिक्रिया उमटली नाही, किंवा कोणालाही बोलावसं वाटलं तर माझ्याशी बोला म्हणणारे तत्सम लोक कुठेच नव्हते, सांगायचं तात्पर्य एवढाच कि अश्यावेळी कोणीही त्या व्यक्तीला साथ देत नाही याउलट एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये असेल तर त्याला निग्लेक्ट किंवा टार्गेट करण्याकडेच लोकांचा काल जास्त पाहायला मिळतो, या गोष्टीची सुरुवात शाळेपासून देखील होते एखादा मुलगा नाराज किंवा डिप्रेस दिसत असेल तर अनेकवेळा शिक्षकच त्याच कारण जाणून न घेता त्यांच्यावर वर्गात अजून अजून मस्करी करून त्याला चेष्टेचा विषय बनवतात किंवा एखादा मुलगा मुलगी जर थोडी दबावात राहत असेल तर त्या व्यक्तीची मेंटल torching किंवा harassment केल्या जाते आणि मग त्या व्यक्तीच जगन असह्य होते अगदीच याचा परिणाम त्या व्यक्तीचा अभ्यास आणि इतर गोष्टीवर होते, आणि समूहानेमिळून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणे सोपे जाते त्यामुळे इतर लोक सुद्धा अश्यावेळी त्या व्यक्तीला टार्गेट करण्याचा पाहतात.

भारतात तरुणाच्या आत्महत्या, मानसिक आरोग्य हा पुढे वाढत जाणारा एक गंभीर प्रश्न आहे त्यामुळे शिक्षणात जेव्हा मुलगा ८ वि अथवा ९ वि मध्ये जातो तेव्हा त्यांना मानसशास्त्र नावाचा एक विषय ठेवण्याची गरज आहे जेणेकरून मुलांचं प्रबोधन होईल आणि ते कोणाचं मानसिक शोषण अथवा त्यांचं कोणीही मानसिक शोषण करू शकणार नाही, पण या सोबतच गरज आहे पालकांनी आपल्या पाल्याना मानसिक दृष्टीनं खंबीर बनवण्यासोबतच त्यांना चांगली शिकवण देण्याची जेणेकरून ते या गोष्टीला बळी पडू नये आणि त्यांच्यामुळे सुद्धा कोणी या प्रकारचं पाऊल उचलू नाही.
आयुष्य हे एकदाच मिळत एकाद्या गोष्टीपासून तुम्हाला त्रास होता असेल तर ती गोष्ट सोडून द्या पण असे पर्याय उचलू नका 

:- प्रसाद पाचपांडे
   अमरावती

Friday, 20 April 2018

तुझ्या त्या प्रत्येक शब्दासाठी


तुझ्या त्या प्रत्येक शब्दासाठी
आज सुद्धा झुरतो मि
तुझ्या प्रत्येक हाके ची
वाट आज पाहतो मि

तुझ्या प्रत्येक हास्यात
गीत माझे शोधतो मि
तुझ्या प्रत्येक दुःखात
अश्रु माझे जपतो मी

चूक ती माझी होती
जी तुझ्यावर निघाली
पण आज पण त्या चुकीची
शिक्षा भोगतो मी

तुझ्या झालेल्या प्रत्येक
वेदने मधे हृदय माझे टूटत होते
फक्त तुझे मन राखण्याची
ते वाट पाहत होते

तुझ्या प्रत्येक शब्दाला
आज सुद्धा झुरतो मी
हरवलेल्या त्या आठवणी मध्ये
स्वतःला शोधतो मी

प्रसाद पाचपांडे
अमरावती/ नवी मुंबई


Wednesday, 11 April 2018

महात्मा फुले याना एक पत्र



आदरणीय महात्मा फुले याना विनम्र अभिवादन , आज तुम्हाला विचार आला असेल आज याला आपली आठवण कशी काय आली , तसं तुम्ही पाहत असालच इथे निवडणूक जवळ आल्या कि इथल्या लोकांना राजकारण्यांना तुमची आठवण येतेच कि कारण येथे तुमचं नाव घेतलं आणि तुमचा फोटो बॅनर ला लावला कि इथे स्वतःला पुरोगामी म्हणवून घेता येते ,तुमचं कार्य एवढा मोठं आहे कि आजसुद्धा तुमचा नावाचा वापर करून इथे स्वतःला पुरोगामी म्हणवून घेता येते, आज या पात्राच्या निमित्याने या काही भावना तुमच्या पर्यंत पोहचवत आहे
महात्मा फुले आम्हाला माफ करा
तुम्ही इथे गोर गरीब लोकांना शिक्षण मिळावे म्हणून अनेक शाळा उघडल्या पण आज इथे तुमचा नावानी अनेकांनी इथे मोठ्या शाळा आणि शिक्षण संस्था उघडल्या आणि त्याच संस्थेमधून भरमसाठ फी आकारानं सुरु आहे ,अगदीच काय इथे शिक्षणाचं बाजारीकरण सुरु आहे.

तुम्ही ज्या भिडे वाडा मध्ये मुलीची पहिली शाळा सुरु केली त्याची अवस्था फार दयनीय झाली आहे , इथल्या राजकारण्यांना तुमचा नावाचे मोठे बॅनर लावायला वेळ आहे पण भिडे वाड्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही .

तुम्ही स्वतःच्या पत्नीला शिकवून पहिली मुख्यध्यापिका बनवून समाजासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित केला होता पण आज सुद्धा तुमचं नाव घेणारे लोक एकीकडे स्वतःच्या घरच्या स्त्रीला मात्र पदर घेऊन किंवा बुरखा घालून चौकटी च्या आतच ठेवतात , अनेकांच्या घरी आज सुद्धा मुलगा आणि मुलीच्या शिक्षण मध्ये तफावत पाहायला मिळते.

मुलींसाठी तुम्ही इथे ठिकठिकाणी शाळा उघडल्या , स्त्रियांना पुरुषांप्रमाणे शिक्षण मिळावं , समानता मिळावी म्हणून तुम्ही प्रयत्न केलेत , आमच्या साठी तुम्ही पहिले स्त्रीवादी म्हणजे फेमिनिस्ट व्यक्ती आहेत , आज मात्र इथे फेमिनीसम ची अख्खी व्याख्या च इथल्या फेमिनिस्ट लोकांनी बदलून टाकली आहे .

तुम्ही शिवरायांचं पोवाडा लिहिला पण आज तुमचा पूर्ण पोवाडा न वाचता एका शब्दावरून निष्कर्ष काढणारे अनेक लोक आहेत.

तुमचं  नाव घेऊन काही लोक इथे द्वेष पसरवण्याचं सुद्धा काम करतात पण कदाचित ते हे विसरले कि ज्यांचा विरुद्ध ते द्वेष पसरवत त्याच समाजातील मुलगा तुम्ही दत्तक घेतला होता .
अजून सुद्धा बरंच काही सांगायचं पण तूर्तास एवढंच , शेवटी एवढंच सांगावं वाटते तुमचा नावाचा लोकांनी फक्त राजकारण पुरता न करता तुमचं शिक्षणाचं कार्य पुढे नेण्याकरिता अखंड करावा
तुमच्याच महाराष्ट्रातील एक तरुण

Sunday, 11 February 2018

प्रेम आणि भावना

आजकाल बरेच जन येथे प्रेमावर लिहितात तर अनेक लोकांना येथे सिम्पल सिम्पल हवी असे म्हणनारे सुद्धा बरेच् आहे
मी कॉलेज मधे असताना त्या काळी तरुणां मधे असणार प्रेम हे जगजीत सिंह यांच्या होश वालो को खबर नाही या गाण्या सारखा असायचं  आणि जो संपायचं  ते ' हम लबो से कह न पाये उनसे हाले दिल कभी और वे समझे नाही ये खामोशी क्या चीझ है' . आजकाल प्रेमाची व्याख्या बदलली आहे पहिल्या दिवशी भेट होते आणि दुसऱ्या दिवशी प्रोपोज़ तिसऱ्या दिवशी break up . पण पहिल्या दिवशी भेट झालेल्या माणसाला दुसऱ्या दिवशी प्रेम झाल यात प्रेम असत का? एका व्यक्ति ला जाणून घेण्याकरिता  किवा स्वभाव समजण्याकरिता कमित कमी 2-3 भेटी तरी आवश्यक असतात पण एका दिवसात किवा भेट न होता ही प्रेम होने हे शक्य आहे का कदाचित आजची पीढ़ी ही attraction  ला च प्रेम समजत असावी आणि त्यमागे गुरफटुन गेलि असावी
प्रेम ही एक नाजुक भावना असते जी हळूहळू फुलत जाते ,आपण ज्या व्यक्तिवर प्रेम करतो त्याला आपण प्रेम व्यक्त करायची पण गरज नसते अनेक वेळा न सांगता देखील समोरच्या ला ते कळून चूकते रोज एकमेकांशि भांडणारे किवा 2 दिवस दूर गेले की त्याना दुरावा जाणवू लागतो आणि कळते ते प्रेम अगदी 2 प्रेम करणारे व्यक्ति एकमेकांसोबत रोज भांडणारे मात्र 4 चौघात आपल्या आवडत्या व्यक्ति मागे त्याचा बद्दल चांगलेच बोलताना दिसतात आणि हळुवार फुलत जाणार प्रेम हे आयुष्यभरासाठी असत अगदी
कुसुमाग्रज यांच्या खालील ओळी प्रमाणे असत:
म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं
शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस,
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं!
शब्दांकन 
प्रसाद पाचपांडे
अमरावती /नवी मुंबई

Sunday, 20 November 2016

तुळशी चे लग्न


कधी काळच्या घराना
एक छोटे से आंगन असायचे
त्या छोट्याशा अंगनात
एक तुळशी वृंदावन असायचे
मग यायची दिवाळी
ज्याची सर्व आपुलकी नी वाट बघायचे
दिवाळी नंतर तुळशी चे लग्न असायचे
तुळशी च्या लग्ना साठी
शेजारी नातेवाईक एकत्र यायचे
त्या निमित्य फ़राळ व्हायचं
गोड़ धोढ़ व्हायच
मजा मस्करी व्हायची
लोकांमधल प्रेम जपल जायच
आता सर्वांच स्टैंडर्ड वाढल
स्टैंडर्ड वाढला म्हणुन
रहण देखील बदलल
घरा मधली लोक आता
अपार्टमेंट मधे राहायला लागली
पण आता त्या अपार्टमेंट मधे
माये ची लोक येत जात नाही
कारण घराला नसते आंगन
अंगनात नसते तुळस
आणि होत नाही तिथे
तुळशी चे लग्न
- कवि प्रसाद पाचपांडे

Saturday, 13 August 2016

कोणी सांगेल का तिला

कोणी सांगेल का तिला
कधी कळेल का तिला
तिच्या हृदयात थोड़ी जागा 
देईल का ती मला
अंतरीचे बोल 
कधी कळेल का तिला
मनातील भावना
उमगेल का तिला
कोणी सांगेल का तिला
कधी कळेल का तिला
शब्दचे अर्थ कळतील
का तिला
चेहर्यवरील हसु
बनेल का ती माझ्या
कधी कळेल का तिला
कोणी सांगेल का तिला
प्रसाद पाचपांडे
अमरावती / नवी मुंबई

Sunday, 3 July 2016

lost & found


lost & found नावाचा नवीन मराठी  चित्रपट येतोय एक नवीन विषय घेऊन
आता खरे तर लॉस्ट आणि फाऊंड असे या चित्रपटाचं नाव का ठेवलं असावं हा विचार मनात येतो , पण trailor पाहिल्यावर मग रोजची होणारी मुंबई करांची धावपळ ,त्याचं जीवन आणि त्या बदल्यात घरच्या पासून आणि आपल्या लोकां पासून दूर राहणाऱ्या लोकांमधे आलेला एकटे पणा आणि त्या गर्दी मध्ये तो माणूस कुठे तरी हरवून जातो एकटाच आणि त्यातून वाढत जाणार frustation आपल्या डोळ्यासमोरून जातो अगदी सिनेमाचा पहिला संवाद ऐकलं तरी लक्षात येईल , "जगात खूप एकटेपणा आहे , लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ नसतो , थकवा आहे मानसिक त्रास आहे ".
आणि अश्याच या एकटे पण मध्ये अडकलेले 4 अनोळखी लोक एकत्र येतात , एकमेकांना आधार देतात आणि पुढे हेच 4 अनोळखी  लोक   समाजात हाच वाढत चाललेला एकटेपणा दूर करण्यासाठी एकत्र येऊन काम करायचा ठरवतात  आणि ते एक प्रोग्राम राबवतात anti loneliness प्रोग्राम म्हणजेच ALP आणि त्या अंतर्गत ते ठरवतात की आपण अश्या लोकांना भेटायचं जे स्वतःला एकटे समजत असतील आणि त्यांना सहानुभूती नाही तर एक उमेद द्यायची आणि त्यांचा मधली ती व्यक्ती शोधायची जी हरवली असते
मी समाजात फिरत असताना मला अनेक लोक भेटतात जे एकटे पडले आहे किंवा स्वतःला एकटे समजतात किंवा जे frustation मध्ये असतात , अगदी या लोकांमध्ये घरा पासून दूर असणारे , जॉब सर्च करणारे , प्रेमभंग झालेले किंवा एकटे राहणारे , ज्यांचे मूल दूर राहतात अश्या वेळी त्या लोकांशी आपण 2 शब्द जरी प्रेमाचे बोललो तरी ते त्यांना सुखावतात किंवा अश्या हरवलेल्या लोकांना त्यांचा मधील तो किंवा ती सापडतो .चित्रपटातील 2 ओळी अगदी मनाचा ठाव घेऊन जातात
"अनोळखी लोकच कधी कधी ओळखीची वाटतात
आणि खरंच कोणी तरी हवं असत ना बोलायला ".
आणि अश्यावेळी त्या लोकांनी सुद्धा स्वतःला एकटे समजण्या पेक्षा एखाद्या व्यक्तीला जवळच समजून आपली मनातली गोष्ट सांगावी , कदाचित त्याचा मधील किंवा तिच्या मधील त्या व्यक्तीला हरवलेली तो किंवा ती व्यक्ती भेटून जाईल
याच एकटे पणा वर आणि या चित्रपटाला dedicated माझ्या 4 ओळी
"तहानलेल्या पाखराला जशी पाण्याची आस असते
एकटेपणा मध्ये सुद्धा  तशी कोणाची साथ हवी असते
अश्यावेळी दोन शब्द मायेचे सुद्धा मनात घर करून जातात
प्रेमाची नवी पावली मनात घर करून जातात".
-प्रसाद पाचपांडे
अमरावती / नवी मुंबई

Friday, 8 April 2016

व्याकूळ

तुझ्या त्या आठवणीने
आज सुद्धा व्याकूळ होतो मी
हरवलेल्या त्या शब्दांमध्ये
आज सुद्धा तुला शोधतो मी
पहाटेच्या त्या धुक्यांमध्ये
स्वप्न रंगवत होतो मी
रस्त्यावरील मृगजळाला
सत्य समाजात होतो मी
भावनेमध्ये अडकून
असा का गाफील होतो मी
जिंकायचे सोडून
पर्त्येक गोष्ट हरवत होतो मी
तुझ्या त्या आठवणीने
आज सुद्धा व्याकूळ होतो मी
हरवलेल्या त्या शब्दांमध्ये
आज सुद्धा तुला शोधतो मी
 कवी :- प्रसाद पाचपांडे
           अमरावती /नवी मुंबई

Saturday, 3 January 2015

वैदर्भिअन पुणेकर

मी एक वैदर्भिअन पुणेकर 
मी एक वैदर्भिअन पुणेकर 
जन्माने वैदर्भीय ,
तर नोकरीसाठी पुण्यात आलेलो 
पुण्याच glammer पाहून भारावून गेलेलो 
पण शेतकयांच्या आत्महत्या पाहून व्यथिथ झालेलो 
मी एक वैदर्भिअन पुणेकर 
मी एक वैदर्भिअन पुणेकर 
सारसबाग ,तुल्सिबाग सारे काही फिरून आलेलो 
जॉब साठी consultancy पण पाहून आलेलो
हाती काही उरल नाई तरी पैसे खर्चून आलेलो
जोब मिळाला नाई तरी पुणा फिरून आलो
मी एक वैधर्भिअन पुणेकर
मी एक वैदर्भिअन पुणेकर
आता मात्र हवालदिल झालो
घराच्या आठवणीने व्याकूळ झालो
पुण्यालाच घर मानून
इथे मी स्थाईक झालो
- प्रसाद पाचपांडे

Friday, 21 November 2014

BE फायनल इयर

karrox करून  करून  जीव  जातो  वैतागून ,
शेवटचा  तास   करतो  मी  मागे  झोपून ,
 जावा,डॉट नेट पण  आहेत सोबतीला
 वेळ  नाही  मिळत  सदया   कुठे  फिरायला  ...
GATE चे  बुक  पाहून  डोळे  येतात  भरून  ,
कधीतरी  वाटते  बुक  पाहावे  एकदा  उघडून .,
apticha   पण  वीचार  येतो  कधीतरी  मनात ,
PHP मात्र  आहे  तळ्यात  आणि  मळ्यात ...
घरी जाऊन   एकदा  प्रोग्राम  करायचं  म्हणतो ,
घरीगेल्यावर मात्र  pc प्रोब्लेम  देतो ..
pc ची  पण  आहे  आमच्या  मोठीच  गम्मत ,
चालू  केल्यावर  एकदा  होतो  restart  परत  परत ..
अशी  आहे  आमची  कहाणी
BE फायनल इयर ची जुबानी 

Wednesday, 19 November 2014

जीवन

जीवन  म्हणजे  निळ्या  निळ्या  नभातील  टपोर  चंदन  असत
प्रेमामध्ये  पडत  जाणार  पाहिलं  पाऊल हे  जीवन  असते
नुकतच  जन्मणार  मुल  हे  जीवन  असते ,
काळी  मधून  उमलणार  फुल  हे  जीवन  असते .........

जीवन  म्हणजे   असतो  अमृताचा  झरा,
जे  जगण्या  करिता  येतात  असंख्य  तारे  आणि  तारका ,
जीवन  म्हणजे  कष्टाकार्याची  भाकरी ,
आई  ची  मुलाला  मिळणारी  प्रेमाची  सावली .............!!!

जीवन  हे  एक  सुंदर  रोपट असत
कुणीही  सोबत  नसाल  तरी  ते  जगायचं  असत
कुणीही  काही  मागितलं  तरी  ते  द्यायचं  असत
पण  दिलेलं  परत  हे  मागायचं  नसत ..............

असे  हे  आपल  जीवन  असत
ज्यात  कधीही  थांबायचं  नसत
थोडावेळ  विश्रांती  घेऊन
पुढच  पाऊल  हे  टाकायचाच  असत
            - प्रसाद पाचपांडे
            पुणे / अमरावती 

Thursday, 4 September 2014

नेमेचि येतो पावसाळा!


दरवर्षी पाऊस येतो, पाऊस म्हटला कि लहान मुलांसाठी शाळेच्या सुट्या, तरुणांसाठी असणार ते रोमांटीक वातावरण,गरम गरम भजे असे काही असते, अनेक तरुणांना तर पाऊस पाहून आपल्या प्रेयसी साठी कविता पण सुचतात ,असे हे पावसाच वातावरण असते, मला अश्या या पावसाळ्यात सगळ्यात जास्त आठवण येते ती माझ्या आजीची ,दरवर्षी पावसाळा सुरु झाला कि आजीची काळजी सुरु व्हायची ,११ वी मध्ये गेल्यानंतर जवळपास माझा जुना raincoat खराब झाला होता आणि फाटला देखील होता, तसेच पावसाळा सुरु झाला होता, ज्याप्रमाणे प्रत्येक मुलाच्या कॉलेज नियमित जाण्यामागे काहीतरी कारण असत त्याप्रमाणे माझ सुद्धा कारण होताच त्यातलं एक म्हणजे मी तसा काहीसा अभ्यासू पण होतो आणि मग कॉलेज वरून येतांना रोज भिजलेलो असायचो ,आजी मग रोज मी रेनकोट घ्यावा म्हणून मागे लागायची, तसेच रोज आईला म्हणायची कि दादासाठी रेनकोट घ्यावा लागेल,पण मी रोज दुर्लक्ष करायचो ,कारण मला पावसात भिजायला आवडायचं, हाच उपक्रम १२ वी मध्ये पण चालला आणि पुढे अभियांत्रिकी च्या 1st सेमिस्तेर ला सुद्धा जवळपास कॉलेज ला जाण्याचा कारण सारख असल्यामुळे तेव्हासुद्धा रोज जायचं आणि भिजून यायचो ,आणि आजी रोज रेनकोट बद्दल म्हणायची ,गाडी शेवटी ज्यादिवशी आजीची तब्येत जास्त झाली होती आणि आम्ही आजीला दवाखान्यात नेणार त्यासाठी मी आणि माझा मित्र राहुल भिजून आलो होतो ,तेव्हासुद्धा आजी आईला म्हणत होती कि "दादा पावसात ओला होतो आणि त्याचे पुस्तक खराब होतात त्यासाठी रेनकोट घेशील ".
आज इतक्या दिवसांनी असाच मी पाऊस आला कि भिजून जातो आणि आज सुद्धा मी रेनकोट घेतलेला नाही आहे , मग पावसोबत आजीच्या आठवणीमुळे भिजून गेलो कि,रस्त्याने नातवाला घेऊन जाणार्या एखाद्या आजीच्या छत्रीत हळूच जातो , मग ती आजी मला विचारते कि भिजला का रे भेट रेनकोट नाही का तुझ्याकडे?
- प्रसाद पाचपांडे अमरावती

Wednesday, 11 June 2014

शिवराज्याभिषेक दिन

सोनियाचा दिवस आज उगवला
जिजाउचा शिवबा आज छत्रपति जाहला
स्वराज्याचे तोरण सजले
आज रयतेचे राज्य आले ------------ 1
व्यर्थ नव्हे ते बाजी तानाजी चे बलिदान
याच स्वराज्यासाठी ज्यांनी दिले अपुले प्राण
तोचि मंगल दिवस आज उगवला
जिजाउचा शिवबा आज छत्रपति जाहला ------२
जुलमी मुघलांचा त्रास ज्यांनी रोखला
स्त्रियांना येथे सन्मान दिधला
शेतकऱ्यांचा कैवारी बनुनी
जिजाउचा शिवबा आज छत्रपति जाहला ----२
वापर करुनिया गनिमी काव्याचा
पाडाव केला शत्रूंचा
रक्षण करुनिया सज्जनाचा
कर्दनकाळ बनला दुर्जनांचा -------३
होती सुरुवात शिवशकाची
वाजे तुतारी येथे शिवशाहीची
तोचि मंगल दिवस आज उगवला
जिजाउचा शिवबा आज छत्रपति जाहला------४
                 -  प्रसाद पाचपांडे

Monday, 2 June 2014

अखंड सावधान असावे





काल आणि परवा फेसबुक वरील वादग्रस्त फोटो आणि मजकुरामुळे काहीसा तणाव निर्माण झाला होता ,ज्यांनी कोणी हा प्रकार केला तो मुळात निन्दनियच होता ,पण पोलिसांनी आणि जागरूक नागरिकांनी दाखवलेल्या जागरूक पणामुळे हा प्रकार कमी होण्यात मदत लाभली ,ह्या प्रकारची सुरुवात मुळात एका व्यक्तीचे फेसबुक पेज hack करून झाली ,आणि नंतर अफवांचे पेव उठले कुठे मस्जिद चे फोडलेले फोटो शेयर होता होते तर कुठे मुलाला मारलेला फोटो शहरे करत होते पण याही परिस्थितीत काही जागरूक नागरिक प्रसंगावधान ह्या अफवा खोडून काढत होते ,पण अश्या गोष्टी परत होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेण खूप गरजेची आहे, इथे आपल्या समर्थ रामदास स्वामींची ओळ जी आतापण आपल्या कामात येते " अखंड सावधान रे | प्रयोग प्रेत्न मात्र रे | प्रसंग हा तुफान रे | नकोचि वेवधान रे" ,त्यानुसार आज वागण खरच गरजेच आहे ,त्यामुळे पहिले तर आपण सोशिल मेडिया मधील सावाधान्तेबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया
१) कोणाची request स्वीकारतांना त्याची request स्वीकारण्याआधी त्याची प्रोफाइल एकदा तपासून पहा कि हे फेक account तर नाही .
२)अनेक जणांना पोस्त न वाचता ती like करण्याची सवय असते ,त्यामुळे कृपया आधी ती like करण्या आधी त्यात काही आक्षेपार्ह नाही ये बघूनच like करावी
३) बाहेर cyber कॅफे वर पासवर्ड रिमेम्बर करू नये
४) मुलींनी शक्यता आपला फोटो अपलोड करण्याच टाळावे
५) सहसा आपण स्वताच कुठे भडक comment देऊ नये
६) कोणत्याही व्यक्तीला एखाद्या पेज च अद्मीन बनवतांना तो आपल्या ओळखीतला बनवावा
७)कोणी आपल्याला अक्षेपार्या tag केल्यास ते रेमोवे करावे
८) आक्षेपार्ह फोटो whats अप्प वरून शहरे करू नये
ह्या गोष्टीची काळजी घेतल्यास असे प्रकार कमी होतील ,त्यामुळे समर्थांचे वाक्य लक्षात घेऊन फक्त फेसबुकच नव्हे तर इतर ठिकाणी सुद्धा अखंड सावधान असावे जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात इतर ठिकाणी सुद्धा कामात येईल ,खरतर हे वाक्य समर्थ रामदास स्वामींनी संभाजी राजांना पाठवेल्या पत्रात त्यांनी लिहिले ,संभाजी राजांना असलेल्या स्वकीय तसेच परकीय शत्रूंचा धोका लक्षात घेत समर्थांनी त्यांना पत्र लिहिले होते पण त्यांचे हे उपदेश आज सुद्धा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचे भाग बनून जातात
- प्रसाद पाचपांडे 

Thursday, 16 January 2014

विज्ञाननिष्ठ सावरकर


विज्ञाननिष्ठ सावरकर :
स्वातंत्रवीर सावरकर म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर उभी राहती ती त्यांची ऐतिहासिक उडी , ते एक स्वतंत्र सैनिक , लेखक कवी म्हणून सर्वांना परिचित तर आहेच पण त्यासोबतच ते , विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते सुद्धा होते ,त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली.पण त्यासोबतच अंध श्रद्धे विरोधात असणारे त्यांचे विचार फार कमी लोकांना माहित आहे , सावरकरांचे असे हे विचार त्यांच्या खालील काही पुस्तकातून सहज दिसून येतात , खाली मी त्याची लिंक सुद्धा दिली आहे ज्यांना हवी असेल ते download पण करू शकता
१)जात्युच्छेदक निबंध
http://www.savarkar.org/content/pdfs/mr/jaytuchhedak-nibandh-kh6-mr-v003.pdf
२) अंधश्रद्धा निर्मूलन कथा भाग १ व २ http://www.savarkar.org/content/pdfs/mr/andhashradhha-nirmulan-katha-kh6-mr-v002.pdf
३)विज्ञाननिष्ठ निबंध भाग १ व २
http://www.savarkar.org/content/pdfs/mr/vidnyan-nistha-nibandh-kh6-mr-v002.pdf